- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : नियमित कर भरणाऱ्यांना कोणतीही करवाढ, दरवाढ न करता सोमवारी झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत १३७८ कोटी रुपयांच्या सोलापूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली.
या योजनेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे. शहरी भाग आणि हद्दवाढ भाग अशा संपूर्ण शहराला दररोज २४ तास समतोल पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली. पूर्वीच्या ८९२ कोटी रुपयांच्या मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये जागतिक बँकेने आणि महाराष्ट्र शासनाने काही सुधारणा करण्यास सांगितल्या होत्या. त्यानुसार त्या सुधारणा करून नव्याने १३७८ कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.
सुधारित पाणीपुरवठा योजनेमध्ये १५० कोटी रुपयांच्या शासनाला भरावयाच्या जीएसटी कराचा समावेश आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पूर्वीच्या योजनेतील १२० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राऐवजी १५० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. पूर्वीच्या योजनेनुसार शुद्ध जलवाहिनी (फिडर मेन) ६५.७८ किमीची होणार होती. सुधारित योजनेअंतर्गत ती ७७.८ किमीची असेल. पूर्वीच्या योजनेत ११ एमएलचे ६ एमबीआर (मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायर) प्रस्तावित होते. सुधारित योजनेनुसार २९ एमएलचे १० एमबीआर राहणार आहेत. ३१.८ एमएलचे २४ उंच जलकुंभ (इएसआर) बांधण्याचे नियोजन पूर्वीच्या योजनेत करण्यात आले होते. मात्र शहराच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेऊन सुधारित योजनेनुसार आता ५३.३ एमएलचे ३० उंच जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. शहरात समतोल पाणी वितरण व्यवस्थेसाठी ७२० किमी जलवाहिनी अंथरण्यात येणार होती. सुधारित योजनेनुसार शहरात एकूण १११७ किमी जलवाहिनी अंथरण्यात येणार आहे.
पूर्वीच्या योजनेनुसार ४० हजार एएमआर मीटर बसविण्यात येणार होते. सुधारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत यात २ लाख १८ हजार ८५३ मेकॅनिकल मीटरची वाढ करून एकूण २ लाख ४८ हजार मिळकतींना पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत या निर्णयामुळे सोलापूर शहरात पाण्याची मोठी बचत होणार असून नागरिकांकडून पाण्याचा जितका वापर होईल तितकेच बिल नागरिकांना येणार आहे, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले.
Web Summary : Solapur approves ₹1378 crore water scheme without tax hikes. The project, funded by the World Bank, ensures 24/7 water supply. Upgrades include larger purification centers and increased metering for efficient water usage, promoting conservation.
Web Summary : सोलापुर ने बिना कर वृद्धि के ₹1378 करोड़ की जल योजना मंजूर की। विश्व बैंक द्वारा वित्त पोषित परियोजना 24/7 जल आपूर्ति सुनिश्चित करती है। कुशल जल उपयोग और संरक्षण को बढ़ावा देने के लिए बड़े शुद्धिकरण केंद्र और मीटरिंग में वृद्धि शामिल है।