सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष गाडी मार्च अखेरीपर्यंत धावणार

By रूपेश हेळवे | Published: January 2, 2024 05:44 PM2024-01-02T17:44:39+5:302024-01-02T17:45:07+5:30

प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची कालावधीची वाढ केली आहे.

Solapur ajmer weekly special train will run till the end of March | सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष गाडी मार्च अखेरीपर्यंत धावणार

सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष गाडी मार्च अखेरीपर्यंत धावणार

रुपेश हेळवे,सोलापूर : प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची कालावधीची वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यात सोलापुरातून जाणारी सोलापूर - अजमेर साप्ताहिक विशेष गाडीला २७ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

तसेच बिकानेर - साईनगर शिर्डी - बिकानेर साप्ताहिक विशेष अधिसूचित गाडी ३० डिसेंबर २०२३ पर्यंत होती, या गाडीला मुदत वाढ मिळाली असून ही गाडी आता ६ जानेवारी पासून ३० मार्च पर्यंत धावणार आहे. म्हणजेच या गाडीचे १२ फेर्या होणार आहे. तसेच साईनगर शिर्डी - बिकानेर गाडी ३१ मार्च पर्यंत सुरू असणार आहे. तसेच अजमेर - सोलापूर - अजमेर साप्ताहिक विशेष अधिसूचित २७ डिसेंबर २०२३ पर्यंत होती. ती आता ३ जानेवारी पासून ते २७ मार्च २०२४ पर्यंत धावणार. म्हणजेच एकूण १३ जादा फेर्या होणार आहे. तसेच सोलापूर - अजमेर विशेष अधिसूचित गाडी २८ मार्च पर्यंत धावणार आहे.

Web Title: Solapur ajmer weekly special train will run till the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.