शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प पाण्यावर ६० गुंठ्यात ९ टनावर ढोबळी मिरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:56 IST

शेतशिवार यशोगाथा; अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील शेतकरी मल्लिनाथ प्रचंडे याची कहाणी

ठळक मुद्दे मागील वर्षी ३ एकर मध्ये कलिंगडाचे १५ लाख रुपयांचे फळपीक घेतले़यंदा जून महिन्यात मल्लिनाथ यांनी स्वत:च्या ६० गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवडकेवळ ६० गुंठ्यात आणि अत्यल्प पाण्यावर लाखो रुपयांची ढोबळी मिरचीचे पीक घेतले

उडगी : सध्याची अवर्षण परिस्थिती पाहता स्वत:च्या शेतीत कोणी नवा प्रयोग करण्याची हिम्मत करत नाही़ नशिबाला दोष देत काही शेतकरी एकीकडे हतबलता व्यक्त करतो तर दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील गळोरगीच्या मल्लिनाथ प्रचंडे या तरुण शेतकºयाने ढोबळी मिरचीच्या माध्यमातून यशस्वी शेती करून दाखवली आहे. केवळ ६० गुंठ्यात आणि अत्यल्प पाण्यावर लाखो रुपयांची ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे़ त्यांच्यातील कल्पकता, प्रयोगशीलता आणि कठोर परिश्रमाचे अक्कलकोट तालुक्यातून कौतुक होत आहे़ मल्लिनाथ हे दहावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण न घेता १५ वर्षे वाहन चालक म्हणून काम केले. या कामात मन रमत नसल्याने शेती करण्याचा निश्चय केला. शेतीत नवनवीन प्रयोग सुरु केले आणि ते यशस्वीही झाले.

 मागील वर्षी ३ एकर मध्ये कलिंगडाचे १५ लाख रुपयांचे फळपीक घेतले़ या प्रयोगानेच त्यांना यू टर्न मिळाला़ यंदा जून महिन्यात मल्लिनाथ यांनी स्वत:च्या ६० गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली. मिरचीच्या लागवडपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून घेतली. त्यानंतर बोरामणीतील सचिन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ढोबळी मिरचीची लागवड केली़ पाण्याच्या बचतीसाठी त्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरल्या़ त्यावर मल्चिंग पेपर अंथरले़ नान्नज येथून बेळगावी पोपटी जातीची ढोबळी मिरचीची १५ हजार रोपे आणली.

ती चार बाय दीड फूट अंतराने लावली़ पिकाच्या संरक्षणासाठी शेडनेटचा वापर केला़ मल्लिनाथला यातून ४० टन ढोबळी मिरची उत्पादनाची अपेक्षा आहे. यातून    रोपं, खते, कीडनाशक,  ठिबक, वाहतूक, मजुरी असा दोन लाखांचा खर्च वजा करता मल्लिनाथला  सात लाखांचा निव्वळ नफा होणार आहे.

पहिल्याच तोडीत निघाली दीड टन मिरची - लागवडीनंतर ३ पोते डीएपी, २ पोती लिंबोळी पेंड, २ पोती युरिया खत टाकू न दर तीन दिवसांनी कीडनाशक आणि बुरशी नाशकाच्या फवारण्या केल्या. लागवडीनंतर २५ दिवसांनी मिरची तोडणीस तयार झाली. पहिल्याच तोडीला दीड टन ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळाले़ आठवड्यातून एकदा या मिरचीची तोडणी केली जाते आणि ही मिरची प्लास्टिक पिशवी भरून हैदराबाद बाजारपेठेत पाठवली जातेय. आत्तापर्यंत तीन तोडी झाल्या असून असून त्यातून ९ टन उत्पादन मिळाले आहे. आज किलोमागे २० ते २२ रुपयांचा दर मिळाला असून पुढील दोन ते तीन महिने यातून उत्पादन मिळतराहणार आहे़

योग्य नियोजन, श्रमाची तयारी, सूक्ष्म जलसिंचन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ढोबळी मिरची लागवड केली़ आजच्या परिस्थितीला हतबल न होता योग्य नियोजनावर भरघोस पीक घेऊ शकतो़ - मल्लिनाथ प्रचंडे,शेतकरी, गळोरगी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी