शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील मेंढपाळ तुळजापूर परिसरात दाखल

By admin | Updated: October 23, 2014 14:41 IST

कर्नाटकात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी कर्नाटक राज्यातील मेंढपाळ मराठवाड्यात दाखल झाले आहेत. ते वर्षभरापासून तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यात आश्रय घेत आहेत.

तामलवाडी : कर्नाटकात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी कर्नाटक राज्यातील मेंढपाळ मराठवाड्यात दाखल झाले आहेत. ते वर्षभरापासून तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यात आश्रय घेत आहेत. रेवाप्पा ठिगले (रा. लिंबाळा जि. विजापूर) यांच्यासह जवळपास सातजणाचे मेंढय़ाचे कळप सध्या तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा शिवारात वास्तव्यास आहेत. एक हजार मेंढय़ा, घोडी, मुलाबाळासह वर्षभरापासून भटकंती करीत आहेत. शाळकरी मुले गावी ठेवतो. इतर लहानग्यांना सोबत घेवून चारा पाण्याविना उपाशी मरणार्‍या जनावरांना जगविण्याचे काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. सध्या माळुंब्रा शिवारातील मठाची जमीन या मेंढपाळांना एक पर्वणी ठरली आहे. रेवाप्पा ठिगले, पंडू ठिगले, परमु दुधनार, विरु ठिगले, रमेश देवकते यांचे कळप एकत्रीत राहतात. मेंढय़ासोबत सण साजरा करतो. वर्षभरापासून गावापासून दूर आहे. उन, वारा, पावसास तोंड देत जीवन जगतो. १ वर्ष झाले गाव सोडून, तुळजापूर तालुक्यात बर्‍यापैकी चारा-पाणी मिळते. त्यामुळे काळजी वाटत नसल्याचे रेवाप्पा ठिगले यांनी सांगितले. तर मेंढय़ा शेतात बसविल्यानंतर त्या शेतात रासायनिक खत वापरायची गरज नसते. परंतु, सध्या परिसरामध्ये शेती रिकामी झाली नसल्याने मेंढय़ा बसविण्यासाठी शोधाशोध करावी लागत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (वार्ताहर)