शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

नवीपेठेच्या प्रश्नावर रंगू लागल्या कविता अन् पेश केली जाऊ लागली शेरो-शायरी !

By appasaheb.patil | Published: December 19, 2019 4:10 PM

नव्या पेठेत नेता येत नाही गाडी...मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ?

ठळक मुद्दे- सोलापुरातील नवी पेठेत नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी सुरू- या निर्णयाला व्यापारी, लोकप्रतिनिधी व स्थानिकांनी केला विरोध- बंद केलेले रस्ते खुले करण्याची व्यापाºयांची मागणी

सोलापूर : नव्या पेठेत नेता येत नाही गाडी़़़मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? मला समजू नका वेडी...चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी...अशा एक ना अनेक कविता, शेरो-शायरीने नवीपेठेच्या ‘नो व्हेईकल झोन’ बाबत पोलीसांनी घेतलेल्या भूमिकेवर सोशल मिडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

सोलापुरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाºया नवीपेठेत सोमवारपासून सोलापूर शहर पोलीसांनी ‘नो व्हेईकल झोन’ ची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे़ नवीपेठ बाजारात जाणारे सर्वच मार्ग बॅरिगेटस लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीपेठेत एकही दुचाकी अथवा चारचाकी गाडी जात नाही़ या पोलीसांनी घेतलेल्या निर्णयाला व्यापारी, लोकप्रतिनिधी, स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.

 

या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या आलेल्या कमेंटस  https://www.facebook.com/100000862242038/posts/2744950482210333/

दरम्यान, सोशल मिडियावरही या नो व्हेईकल झोनच्या प्रश्नावर सोशल मिडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत़ एवढेच नव्हे तर या प्रश्नांवरून कविता, शेरो-शायरी करण्यात येत आहेत़ सतीश वैद्य या फेसबुक युजरने नवीपेठेत नेता येत नाही गाडी़़़मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? अशी पोस्ट शेअर केली आहे़ या पोस्ट शेअरनंतर नेटिझन्सकडून विविध कमेंट देण्यात येत आहे.

 श्रीनिवास माधवराव वैद्य या युजरने मला समजू नका वेडी़़़चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी असे उत्तर दिले आहे. भाग्यश्री सराफ ने पैठण आणि येवल्याला जाते हो गाडी, चार चाकीत तिची आणि तुमची जोडी, जावे चाखीत थोडी द्राक्षांची गोडी, कारण न सांगता आणावी पैठणी साडी..अशी कमेंट केली आहे़ त्यानंतर चन्नवीर चिट्टे या फेसबुक युजरने पवार साडी सेंटर, चाटी गल्ली, चाटला साडी सेंटर, भवानी पेठ, साड्यांची प्रसिध्द दालने़ उगीच कारण नका सांगू निदान आजच्या तारखेला तरी..ना आणताही साडी घेऊ आपण आयुष्यातली गोडी असे एकापेक्षा एक कविता, शेरो-शायरीने कमेंट बॉक्स हाऊसफुल्ल झाला आहे.

एवढेच नव्हे तर एका फेसबुक युजरने नवीपेठेत करण्यात आलेल्या नो व्हेईकल झोनविरोधात एक पोस्ट शेअर केली आहे़ या पोस्टनंतर नेटिझन्सकडून पोलीस प्रशासनावर टिकेची झोड उठवली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारbusinessव्यवसायSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक