शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 1:56 PM

1 / 10
हे सोशल मीडियाचे जग आहे, इथे कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. कोण आपल्या कामाने तर अभिनयाच्या क्षेत्रात असलेली बरीच मंडळी आपल्या सौंदर्यामुळे प्रसिद्धी मिळवत असते.
2 / 10
स्पर्धा परिक्षांमध्ये मोठे यश मिळवून समाजासमोर नवा आदर्श ठेवणारे अधिकारी प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. आता अशीच एक अधिकारी चर्चेचा विषय बनली आहे.
3 / 10
सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना मात देणाऱ्या अवंतिका तिवारी एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. त्या सौंदर्याच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींना चीतपट करतात.
4 / 10
मध्य प्रदेशातील महिला अधिकारी अवंतिका तिवाही ह्या त्यांच्या साधेपणामुळे खूप चर्चेत असतात. त्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
5 / 10
अवंतिका ह्या सरकारी अधिकाऱ्यासह एक होमिओपॅथिक डॉक्टर देखील आहेत. त्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणा आहे.
6 / 10
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या अवंतिका तिवारी नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असतात. त्यांच्या फोटोंना नेटकरी कमेंटच्या माध्यमातून दाद देत असतात.
7 / 10
मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील पलेरा येथे त्या कार्यरत आहेत. त्या मूळच्या मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील आहेत.
8 / 10
पेशाने डॉक्टर असलेल्या अवंतिका मोफत उपचार करतात. त्यांनी २०१५ मध्ये मध्य प्रदेश राज्य सेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवून अधिकारी होण्याचा मान पटकावला.
9 / 10
सामाजिक कार्यासह धार्मिक कार्यांमध्ये त्यांना रस आहे. त्या विविध कार्यक्रमांमधील फोटो शेअर करत असतात.
10 / 10
सामाजिक कार्यासह धार्मिक कार्यांमध्ये त्यांना रस आहे. त्या विविध कार्यक्रमांमधील फोटो शेअर करत असतात.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीdoctorडॉक्टरMadhya Pradeshमध्य प्रदेश