RPF police responsible for safety of foreigners in labor train ...! | श्रमिक ट्रेनमधील परप्रांतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘आरपीएफ’ पोलिसांवर...!

श्रमिक ट्रेनमधील परप्रांतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘आरपीएफ’ पोलिसांवर...!

ठळक मुद्देगरजू प्रवाशांना, कंत्राटी कामगारांना भोजन, मास्क पुरवठा करण्यासाठी दररोज सुमारे १ हजार आरपीएफ कर्मचारी तैनात सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औषधोपचाराची गरज असणाºया प्रवाशांना पुढील स्थानकात रेल्वेचे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचेही काम

सुजल पाटील 

सोलापूर : कोरोना विषाणू या साथीच्या आजाराविरुद्ध सर्व देशभर सुरू असलेल्या युद्धाच्या वेळी मध्य रेल्वेचारेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) सामाजिक जाणीव आणि प्रतिबंध या प्रत्येक बाबतीत अग्रभागी आहे. रेल्वे अधिकाºयांसमवेत खांद्याला खांदा लावून उभे असलेले आरपीएफचे कर्मचारी, श्रमिक प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी, अपघात टाळण्यासाठी, हजारो मजुरांना अन्नपुरवठा करण्याबरोबरच ३५० श्रमिक ट्रेनमधून पाच लाखांहून अधिक मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी १ हजार ५०० जवान अहोरात्र रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकावर तैनात राहून आपले कर्तव्य बजाविल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

लॉकडाऊन काळातही रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्रवाशांना मार्गदर्शन करणे, महिला व मुलांना मदत करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधी सल्लामसलत करणे व त्यांना सुरक्षित प्रवासासाठी आरपीएफ जवान लॉकडाऊन काळातही कार्यरत आहेत. 
कोणत्याही सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औषधोपचाराची गरज असणाºया प्रवाशांना पुढील स्थानकात रेल्वेचे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचेही काम केले आहे. 

दरम्यान, गरजू प्रवाशांना, कंत्राटी कामगारांना भोजन, मास्क पुरवठा करण्यासाठी दररोज सुमारे १ हजार आरपीएफ कर्मचारी तैनात करण्यात येत असल्याचेही मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले.  

परप्रांतीयांना घेऊन जाणाºया  गाड्यांना एस्कॉर्ट करणे, प्रवाशाने मास्क घातला की नाही यावर नजर ठेवणे, ट्रेनमध्ये आत जाताना, ट्रेनमधील प्रवासात आणि  सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन केले जाते की नाही यावर लक्ष ठेवण्याचेही काम आरपीएफ जवान करीत आहेत.  यासाठी १ हजार ५०० हून अधिक आरपीएफ जवान तैनात करण्यात आल्याचे आरपीएफने सांगितले.

३७ हजार २०० मजुरांना जेवणाचे डबे
च्मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाने एकत्रित येऊन निधी संकलित केला. या जमा झालेल्या निधीतून आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात बेघर, निराधार, गरीब अशा ३७ हजार २०० लोकांना जेवणाचा डबा दिला. याशिवाय रेल्वे स्थानकावर श्रमिक ट्रेनने प्रवास करणाºया प्रवाशांच्या सुरक्षेचीही जबाबदारी ते अहोरात्र पार पाडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जवानांनी बनविले मास्क...
- या संकटाच्या काळात आरपीएफच्या कर्मचाºयांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन  कोरोना आजारापासून आरपीएफच्या जवानांना वाचविण्याच्या आणि मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना पूरक ठरण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण मास्क बनविले. आतापर्यंत १३ हजार ९१९ मास्क, १ हजार ५२२ फेस शिल्ड कव्हर आणि ४३४ शिल्डो मास्क बनविले. 

आपल्या दलाचे मनोबल उंचावणे आणि त्यास धैर्याने तोंड देण्याची तयारी ठेवली आहे. दैनंदिन कामकाजावर मध्य रेल्वेचे अधिकारी पुढाकार घेऊन नियमितपणे परिस्थितीचा आढावा घेत आहेत. जवान व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मोबाईल फोन, वेब सक्षम सेवा, वेबिनार इत्यादींद्वारे संवाद साधण्यात येत आहे. 
-शैलेश गुप्ता,
विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग 

Web Title: RPF police responsible for safety of foreigners in labor train ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.