शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:09 IST

सोलापूर जिल्हा परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा परिषद इंधन बचत करणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा परिषद इंधन बचत करणार आहे. सर्व पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी हे दर सोमवारी सायकल प्रवास करणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे एसटीने येणार असल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे सोलापूर जिल्हा परिषदेमधील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना युध्दजन्य परिस्थिती उदभवल्याने पेट्रोल, डिझेल व तेल यांचा वापर काटकसरीने, गरजेइतका करण्याच्या दृष्टीने तसेच जागतिक तापमान वाढ आणि वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत सोलापूर जिल्हा परिषद मधील सर्व पदाधिकारी/अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेईकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या संदर्भात प्रत्येक सोमवारी नो व्हेईकल डे दिवशी सर्व पदाधिकारी/ अधिकारी कर्मचारी यांनी आपली खाजगी दुचाकी किंवा चार चाकी वाहने कार्यालयात आणू नयेत. खाजगी तसेच शासकीय वाहनांचा वापर टाळण्यात यावा, पर्यायी प्रवासाचा वापर कार्यालयात येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस, सायकल, इलेक्ट्रीक वाहन किंवा पायी येण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी लोकमतशी बोलताना केले आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Zilla Parishad Responds to PM Modi, Saves Fuel

Web Summary : Responding to PM Modi's call, Solapur Zilla Parishad adopts fuel-saving measures. Officials will cycle every Monday. 'No Vehicle Day' promotes public transport, cycling, or walking to reduce pollution and conserve resources, announced Zilla Parishad heads.
टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapurसोलापूर