शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मका खरेदीसाठी नोंदणी अधिक आणि उद्दिष्ट तोकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

सोलापूर : शेतकऱ्यांच्या मागणीनंतर शनिवारी सोलापुरात हमीभावाने मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. येत्या ३१ जानेवारीपर्यंत खरेदीसाठी मुदत देण्यात आली ...

सोलापूर : शेतकऱ्यांच्या मागणीनंतर शनिवारी सोलापुरात हमीभावाने मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. येत्या ३१ जानेवारीपर्यंत खरेदीसाठी मुदत देण्यात आली आहे. मात्र, खरेदीचे उद्दिष्ट कमी आणि शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी अधिक असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

अक्कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी रामवाडी येथील शासकीय गुदामात मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सोलापूरचे प्रांताधिकारी दीपक शिंदे आणि दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांच्या उपस्थितीत शनिवारी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. माळकवठे येथील सोलापूर ॲग्रो प्रोड्युसर कंपनीकडून ही खरेदी केली जाणार आहे. कंपनीचे कार्यकारी अधिकारी हनुमंत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अशोक मिरेखोर यांनी कंपनीच्या व्यवहाराची माहिती दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य एम. डी. कमळे, शांतप्पा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती

--------

बहुव्यवसायी कंपनी शेतकऱ्यांसाठी आधार

माळकवठे येथील सोलापूरॲग्रो प्रोड्युसर ही कंपनी विविध क्षेत्रात शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करते. द्राक्ष उत्पादकांसाठी बेदाणा नेटिंग युनिट, हमी भावाने तूर, मका खरेदी, सामूहिक भाजीपाला उत्पादन आणि विक्री व्यवस्था आदी उपक्रम राबवते. शेतकऱ्यांच्या गरजा जाणून त्यांना मदत करण्याचे काम कंपनीकडून केले जाते. गेल्या चार वर्षांत कंपनीने कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत प्रक्रिया आणि पणन व्यवस्था सांभाळून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

----------

मक्याचे विक्रमी उत्पादन

यंदा मक्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख क्विंटल मका विक्रीसाठी शेतकऱ्यांनी पणन विभागाकडे नोंदणी केली आहे; परंतु शासनाचे खरेदीचे उद्दिष्ट कमी आहे. जिल्ह्यासाठी केवळ ३८,००० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. माळकवठाच्या कंपनीकडे परिसरातील ३०२ मका उत्पादकांनी १२, ००० क्विंटल मका खरेदीसाठी नोंदी केल्या आहेत; परंतू या कंपनीला केवळ अडीच हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या २५ टक्के मका खरेदी करण्यात येणार आहेत. खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे .

----------

मुदत आणि उद्दिष्ट वाढवा

शासनाने जिल्ह्यासाठी दिलेले उद्दिष्ट तोकडे आहे. बाजारात मक्याचा दर कमी असल्याने हमीभावाने खरेदी करण्याची वाढती मागणी होती; परंतु दुसऱ्यांदा दिलेले उद्दिष्ट तोकडे असून वाढीव उद्दिष्ट तसेच खरेदीची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.