सोलापूरला आज रेड अलर्ट; सकाळपासूनच सोलापुरात जोरदार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:59 IST2025-09-27T13:58:57+5:302025-09-27T13:59:52+5:30
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सोलापूरला आज रेड अलर्ट; सकाळपासूनच सोलापुरात जोरदार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर
सोलापूर : हवामान खात्याने आज सोलापूरला रेड अलर्टचा इशारा दिला आहे. शनिवारी पहाटेपासूनच सोलापुरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
शनिवार आणि रविवारीही (२७ व २८ सप्टेंबर) पाऊस पडणार आहे. त्यामुळे महापुराची परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा. धोकादायक इमारतीमध्ये राहू नका. पाऊस सुरू असताना वाहने सावकाश चालवा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागरिकांना केले आहे.
शनिवारी सकाळपासून पाऊस सुरु असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. सीना नदीला महापूर आल्याने जिल्ह्यातील १२९ गावे पाण्यात बुडाली आहेत.
रस्ते, रेल्वे वाहतुकीसोबतच विमानसेवा सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. सोलापूर गोवा विमान सेवा रद्द करण्यात आली आहे.