शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे खासगीकरण : आज निदर्शने

By admin | Updated: May 23, 2014 01:27 IST

बँक संघटनांचा विरोध : नायक समितीचा अहवाल अमान्य

सोलापूर : राष्टÑीयीकृत बँकांच्या खासगीकरणाची शिफरस करणार्‍या पी. जे. नायक समितीच्या अहवालाला बँक संघटनांनी विरोध दर्शविला असून, या अहवालावरील आपला संताप व्यक्त करण्यासाठी येथील बँक कर्मचारी शुक्रवार, दि. २३ मे रोजी सायंकाळी सहा वाजता बँक आॅफ इंडियाच्या रेल्वे लाईन शाखेसमोर निदर्शन करणार आहेत, अशी माहिती बँक कर्मचार्‍यांचे नेते गजानन मेहंदळे यांनी दिली. नायक समितीच्या अहवालाला बँकांच्या देशभरातील दहा संघटनांनी विरोध दर्शविला आहे. सोलापूर जिल्ह्यात आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडिया या दोन्ही संघटनांचा आंदोलनात सक्रिय सहभाग आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्टÑीयीकृत बँकेचे सुमारे तीन हजार कर्मचारी आहेत. या सर्वांचा बँकांच्या खासगीकरणाला विरोध आहे. उद्याच्या आंदोलनात १५०-२०० कर्मचारी सहभागी होतील. बँक, ग्राहक आणि कर्मचार्‍यांच्या हिताचा विचार न करता हा नायक यांनी आपल्या अहवालात शिफरशी केल्या असून, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्वरूपालाच या अहवालामुळे धोका पोहोचणार आहे, असे मेहंदळे म्हणाले. देशभरातील या आंदोलनावर दृष्टिक्षेप टाकला असता, उद्याच्या आंदोलनात देशातील दहा लाख बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. हे कर्मचारी मुख्यत्वे आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, बँक एम्पलॉईज फेडरेशन आॅफ इंडिया, आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक आॅफिसर्स काँग्रेस या संघटनांचे आहेत.

----------------------

कोण आहेत नायक... पी. जे. नायक हे अ‍ॅक्सिस बँकेचे माजी चेअरमन आहेत. सध्या ते रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यकारी समितीचे प्रमुख आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी बँकांच्या खासगीकरणाची शिफरस करणारा अहवाल केंद्र सरकारला सादर केला.

------------------

नायक यांच्या शिफारशी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज एखाद्या कंपनीप्रमाणे असावे बँकांमधील सरकारचे भागभांडवल ५० टक्क्यांपेक्षा कमी असावे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण बँकांची मालकी बँक गुंतवणूक कंपनीकडे हस्तांतरित करणे बँक राष्टÑीयीकरण कायदा आणि एसबीआय कायदा रद्द करणे भागधारकांना मतदानाचा अधिकार देणे