शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर बंधार्‍यातील पाण्याला दुर्गंधी

By admin | Updated: June 3, 2014 00:48 IST

शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात : पाणी सोडण्यासाठी हवा जलसंपदा मंत्र्यांचा आदेश

पंढरपूर : पंढरपूर शहर, सांगोला व शिरभावी या पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरविणार्‍या पंढरपूर बंधार्‍यातील पाण्याला दुर्गंधी सुटली असून, पाण्याला हिरवा रंग आला असला तरी हेच पाणी शहरवासीयांना पाजण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशाने हे पाणी सोडण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात पंढरपूर बंधार्‍यातील पाणी कमी झाले म्हणून गुरसाळे बंधार्‍यातील पाणी या बंधार्‍यात सोडण्यात आले. त्यामुळे पुढील चार दिवसांची पाण्याची सोय झाली. सध्या या बंधार्‍यातील पाणी हिरवेगार झाल्याचे दिसत असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. पाण्यात अळ्या व किडेही दिसत आहेत. हेच पाणी शहरवासीयांना शुद्धीकरण करून पिण्याची वेळ आली आहे. भीमा नदीवरील बंधारे कोरडे पडले असून, नदीकाठच्या गावांच्या पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाल्या आहेत. शेतकर्‍यांची नदीकाठची मुलासारखी जपलेली पिके पाण्यावाचून जळू लागली आहेत. उजनी धरणातून १ जूनला पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या औज बंधार्‍यात पाणी असल्याने पाणी भीमा नदीत सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. सध्या उजनी धरणाच्या उजव्या व डाव्या कॅनॉलला शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. येत्या चार दिवसांत तरी ही पाणीपाळी बंद होणार नसल्याने भीमा नदीत पाणी सोडणे अवघड झाले आहे. सध्या दोन्ही कॅनॉलचे पाणी चालू आहे. नदीत किमान ५ ते ६ हजार क्युसेक्सने पाणी सोडावे लागते. त्यामुळे पाणीपातळी कमी होऊन कॅनॉलला पाणी कमी होते. -

---------------

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदामंत्री सुनील तटकरे मंगळवारी घेणार आहेत. मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली असून, त्यांनी आदेश दिला की, लगेच पाणी उजनीतून भीमा नदी पात्रात सोडले जाईल. —अजयकुमार दाभाडे, अधीक्षक अभियंता, भीमा पाटबंधारे