पोलिसांनी चोपला अन् पाचजणांवर गुन्हा नोंदला‌

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST2021-01-08T05:12:10+5:302021-01-08T05:12:10+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रामचंद्र पवार या तरुणाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने मित्रांना एकत्र करून टेंभुर्णी ...

Police registered a case against Chopla and five others | पोलिसांनी चोपला अन् पाचजणांवर गुन्हा नोंदला‌

पोलिसांनी चोपला अन् पाचजणांवर गुन्हा नोंदला‌

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रामचंद्र पवार या तरुणाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने मित्रांना एकत्र करून टेंभुर्णी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर कुडूर्वाडी चौकात रोडवरच वाढदिवस साजरा करून फटाके फोडून जल्लोष केला. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचा भंग केला.

फटाके फोडून जल्लोष चालू असतानाच पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. जल्लोष करणाऱ्या रामचंद्र पवार, समीर नाईकनवरे, राजेंद्र वाघ, आकाश जगताप व सनी जगताप या पाच तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. त्यांच्यावर बंदी आदेश मोडल्याबद्दल कलम १८८ नुसार गुन्हा नोंदविला आहे. जमावबंदी असताना नागरिकांनी त्याचे उल्लंघन केले. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम करू नयेत. केल्यास त्यांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी दिला आहे.

........................

Web Title: Police registered a case against Chopla and five others