सर्वत्र शरद पवारांचे फोटो, राष्ट्रवादीत फूट पडली नाही; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 16:00 IST2023-08-13T15:59:26+5:302023-08-13T16:00:02+5:30

शरद पवार आणि अजित पवार यांची भेट गुप्त नव्हती. एका उद्योगपतींच्या घरी योगायोगाने झालेली भेट आहे

Photos of Sharad Pawar everywhere, there is no division among nationalists; Explained by Jayant Patal | सर्वत्र शरद पवारांचे फोटो, राष्ट्रवादीत फूट पडली नाही; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

सर्वत्र शरद पवारांचे फोटो, राष्ट्रवादीत फूट पडली नाही; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

सचिन कांबळे

सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. सर्व ठिकाणी शरद पवारांचेच फोटो असतात. सगळे शरद पवार आणि जयंत पाटील यांचे नेतृत्व मान्य करतात, असे मोठ वक्तव्य राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण समारंभ सांगोल्यात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जयंत पाटील हे सांगोल्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले की, माझ्या भावाला ईडीची नोटीस आली हे खरे आहे पण त्याचा आणि कालच्या भेटीचा काही संबंध नसल्याचे ते म्हणाले. कोण कोणाला कधीही कुठेही भेटू शकतो.

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांची भेट गुप्त नव्हती. एका उद्योगपतींच्या घरी योगायोगाने झालेली भेट आहे. मंत्रिमंडळ समावेशाबाबत कोणीही आमदार कधीही मंत्री होऊ शकतो, असे गूढ वक्तव्य या दरम्यान जयंत पाटील यांनी केलं आहे. यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Photos of Sharad Pawar everywhere, there is no division among nationalists; Explained by Jayant Patal