शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

पालकांंनो सावध व्हा, बालकांनो शहाणं व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:04 IST

मी पाचवी-सहावीत असेन. शाळेला जाताना आई- बाबा कधीच पैसे द्यायचे नाहीत. मीच काय माझ्या कोणत्याच मैत्रिणीकडे पैसे नसायचे. कधीतरी ...

मी पाचवी-सहावीत असेन. शाळेला जाताना आई- बाबा कधीच पैसे द्यायचे नाहीत. मीच काय माझ्या कोणत्याच मैत्रिणीकडे पैसे नसायचे. कधीतरी चुकून कोणाकडे तरी एखादा रुपया निघायचा.

एकदा मला माझ्या मैत्रिणीला शाळेच्या मधल्या सुट्टीत बोरं विकणारी शाळेबाहेर दिसली. छोटी छोटी मस्त बोरं! त्याला आम्ही शेंबडी बोरं म्हणायचो. पाहिल्या पाहिल्या तोंडाला पाणी सुटलं. खाण्याचा प्रचंड मोह झाला. पण पैसे? आम्ही दोघी कंगाल. पण बोरं तर खायची होतीच. मग सरळ आम्ही त्या बाईकडे गेलो आणि निर्लज्जपणे म्हणालो ‘ ओ आज्जी थोडी बोरं द्या की,पण आमच्याकडे काहीच पैसे नाहीत.’ हे ऐकल्यावर एकदा-दोनदा हाकललं पण काय कुणास ठाऊक परत बोलावून आमची चिमुकली ओंजळ उतू जाईल इतकी बोरं दिली आणि आम्ही जणू बोराची अख्खी बागच जिंकल्याच्या आनंदात तिथून निघालो. 

हा तसा त्या वयातला निरागसपणा, बावळटपणा आठवला की जाम हसू येतं आज. पण आज या वयातल्या मुलांना नको तितकं शहाणं पाहून आमच्या बावळटपणाचं सच्चा वाटायला लागतो. ज्यात कसलाही दिखावूपणा नाही. काही नकली नाही. जे आहे, जसं आहे तसं आनंदानं स्वीकारल्याच्या खुणा. त्या वेळच्या बालपणात दिसतात आणि आज उसवलेपण झाकून, छोटासा मखमली तुकडाच सगळीकडे मिरवण्याचा आटापिटा केला जातोय. असं वाटत राहतं.

आजच्या लहान मुलांचं अटीट्यूड, त्यांचे कपडे, शूजच्या निवडीतला ठामपणा, मुलीचा मेकअपचा सेन्स, आपल्या दिसण्याचा अतिविचार, सोशल मीडियातलं गुरफटणं. प्रेम, सेक्स याविषयी लहान वयातलं आकर्षण आणि नको तितकी माहिती इत्यादी.  हे असं सारं समोर पाहताना आश्चर्य आणि भीती दोन्ही उभ्या ठाकतात. बºयाचदा पालक आर्थिक परिस्थिती बेताची नसली तरी  मुलांना साºया सुख-सुविधा देण्यासाठी रक्ताचं पाणी करतात. पुढे मुलांनाही आपल्या हट्टांना मंजुरी मिळवल्याशिवाय चैन पडत नाही. यामध्ये पालकांना या गोष्टीचं समाधान असतं की, जे आम्हाला मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतोय. पण समाधानाच्या पायात एक मोठी गोष्ट मुलांना द्यायची राहूनच जाते आणि ती म्हणजे त्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी त्यांना आलेले अनुभव! ते आपल्या मुलांना अशा कुठल्या अनुभवांना भीडू देत नाहीत. त्यांची जडण-घडण, त्यांंचं कष्ट, त्यांच्या अडचणी, अडचणीतून त्यांनी शोधलेले पर्याय, संकटांवर केलेली मात. या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. या अनुभवांपासून ते अनभिज्ञच राहतात. पालक स्वत:च मुलांचे कवच बनून प्रत्येक घाव झेलत राहतात. मग काय मुलांना आयुष्य गोड गोडच वाटायला लागतं.

आयुष्याची दुसरी चव चाखलीच जात नाही आणि मग जेव्हा बोर्डात मार्क कमी पडतात, हवे तिचे अ‍ॅडमिशन मिळत नाही तर कधी कधी माझ्या फोटोला फ. बी. (फेसबुक) वर लाईक मिळत नाही ही सुद्धा मोठी समस्या बनते. अशा अडचणी निर्माण होतात. तेव्हा हे अडथळे  साक्षात पर्वताएवढ्या उंचीचे भासतात. आधी कधी साधी पठारं, डोंगरं सुद्धा वाटेत आलेली नसतात आणि थेट सामना पर्वताशी म्हटलं की, गांगरायला होतं. या वयातही पालकांचाही पवित्रा बदललेला असतो. ते म्हणतात, ‘ आता मोठा झाला आहेस तू. निस्तर  तूच सगळं.’ मग सारंच जीवघेणं वाटतं. डिप्रेशन तर दबा धरुन बसलेलंच असतं. ते लगेच येतं. अस्वस्थ मन भरकटतं. मेन ट्रॅकपासून लांब जायला लागतं. 

या भरकटण्याची पाळमुळं ज्या बालपणात दडलेली आहेत, तिथूनच सावध होणं गरजेचं आहे. असं वाटतं.  त्या वयात येणारा थोडासा अभाव पुढे भरीव यश देणारा ठरतो. स्वत:चं असणं, दिसणं, स्वीकारणं, प्रत्यक्षात हातातल्या  बाबींचा, वास्तवाचा परिचय होणं हे आपल्याला आपली कुवत आणि क्षमता यांची जाणीव करुन देतं. स्वत:ला सिद्ध करण्याच्या धडपडीला आणि स्वत:चं अस्तित्व उभं करण्याच्या प्रयत्नांना तिथूनच सुरुवात होते. जी पुढच्या वाटेतल्या पर्वतांना लहान करत जाते आणि तुम्हाला मोठं करत राहते. - प्रा. ममता बोल्ली(लेखिका सृजनशील युवा कवयित्री अन् साहित्यिक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरchildren's dayबालदिनEducationशिक्षणSocialसामाजिक