शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार गडप्रेमी करणार चंद्रभागा अन् भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 11:35 IST

अखंड राजा शिवछत्रपती परिवाराचा उपक्रम; वृक्षारोपन करून गड किल्ले संवर्धनाविषयी करणार जनजागृती

ठळक मुद्देस्वच्छता आणि वृक्षारोपण आणि गडकिल्ल्याच्या संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यात येणार पंढरपुरातील वीरपत्नी आणि वीरमातांचा सत्कार करण्यात येणार मागील साडेपाच वर्षांपासून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत दुर्ग स्वच्छता मोहीम

सोलापूर : अखंड राजा शिवछत्रपती परिवाराकडून सोलापुरातील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे़ एक मार्च रोजी सकाळी आठ वाजता भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येईल़ त्यापूर्वी २९ फेब्रुवारी रोजी सकाळी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे़ या मोहिमेत राज्यभरातील एक हजार गडप्रेमी, शिवप्रेमी सहभागी होणार आहेत़ या स्वच्छता मोहिमेत सोलापूरकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अखंड राजा शिवछत्रपती परिवाराचे अध्यक्ष आशिष घोरपडे यांनी केले आहे.

अखंड राजा शिवछत्रपती परिवार मागील साडेपाच वर्षांपासून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत दुर्ग स्वच्छता मोहीम राबवत आहे़ २९ फेब्रुवारीला परिवारातील कार्यकर्त्यांचे पंढरपूर येथे आगमन होणार आहे़ शनिवार, दि़ २९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता चंद्रभागा नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे़ दोन तास स्वच्छता मोहीम झाल्यानंतर पंढरपूर शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे़ स्वच्छता आणि वृक्षारोपण आणि गडकिल्ल्याच्या संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे़ दुपारी तीन वाजता पंढरपुरातील वीरपत्नी आणि वीरमातांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आशिष घोरपडे यांनी दिली.

अखंड राजा शिवछत्रपती...- शनिवारी सायंकाळी सहा वाजता अखंड राजा शिवछत्रपती परिवारातील सदस्यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. सायंकाळी सात वाजता शिवस्मारक येथून हुतात्मा चौकापर्यंत जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे़ सर्व सदस्यांचा मुक्काम मराठा मंदिर हॉल येथे असेल़ रविवार दि़ १ मार्च रोजी सकाळी सर्व गडप्रेमी भुईकोट किल्ल्यात एकत्र येणार आहेत.सकाळी सात वाजता ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र होईल़ आठ वाजता स्वच्छतेला सुरुवात होणार आहे़ दुपारी दीडपर्यंत भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे़ त्यानंतर ४ वाजता सर्व गडप्रेमींना निरोप देण्यात येणार आहे़ या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आशिष घोरपडे यांनी केले आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज