अंगावर भिंत पडून बार्शीत वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:27+5:302020-12-05T04:41:27+5:30

बार्शी : येथील औद्योगिक वसाहत नंबर २ मध्ये एका कारखान्याच्या गोदामाची भिंत अंगावर पडून वृद्ध ठार झाला. याबाबत ...

An old man was killed when a wall fell on him | अंगावर भिंत पडून बार्शीत वृद्ध ठार

अंगावर भिंत पडून बार्शीत वृद्ध ठार

बार्शी : येथील औद्योगिक वसाहत नंबर २ मध्ये एका कारखान्याच्या गोदामाची भिंत अंगावर पडून वृद्ध ठार झाला. याबाबत बार्शी पोलिसांनी एका ठेकेदारासह कारखानदारावर गुन्हा दाखल केला आहे.

खासेराव फकिरा ठोंगे (वय ६०, रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी) असे मरण पावलेल्याचे नाव असून १२ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. याबाबत मृताचा मुलगा राहुल खासेराव ठोंगे (रा. उपळाई) यांनी २ डिसेंबर रोजी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ठेकेदार हरिदास मोहन मुसळे व कारखानदार पदमचंद कांकरिया यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खासेराव हे १२ नोव्हेंबर रोजी स्वत:च्या गाडीवरून कामावर आले. ठेकेदार मुसळे यांनी कारखानदार कांकरिया यांच्या गोदामाची भिंत पाडण्याच्या कामावर त्यांना पाठविले होते. भिंत पाडण्याचे काम सुरू होते. इतक्यात भिंत अंगावर कोसळली आणि ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे करत आहेत.

Web Title: An old man was killed when a wall fell on him