मनपाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच

By Admin | Updated: July 2, 2014 00:36 IST2014-07-02T00:36:11+5:302014-07-02T00:36:11+5:30

महापालिकेचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच ठेवावा

The office bearers of the Municipal Corporation | मनपाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच

मनपाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच


सोलापूर : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदली आदेशावर निर्णय होईपर्यंत महापालिकेचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच ठेवावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नरेश पाटील व न्या. रवींद्र घुगे यांनी मंगळवारी दिला.
आयुक्त गुडेवार यांच्या बदलीसंदर्भात चंद्रशेखर पिस्के व अन्य तीन जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड. रामदास सब्बन यांनी गुडेवार यांची बदली करताना बदली कायद्यातील तरतुदीचा भंग झाला आहे, असे निदर्शनाला आणून दिले. त्यावर न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला. महापालिकेचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहील, पुढील आठवड्यात याप्रकरणी सुनावणी घेण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुभाष गुट्टे, अ‍ॅड. धनुरे, अ‍ॅड. अमरनाथ बोद्धूल, अ‍ॅड. शहाजी वाघमोडे हे काम पाहत आहेत. गुडेवार यांच्याजागी अजित जाधव यांची नियुक्ती झाली आहे. पण आता न्यायालयाचा पुढील आदेश होईपर्यंत त्यांना रुजू होता येणार नाही.

Web Title: The office bearers of the Municipal Corporation