शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या सात ने वाढली; आज एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 8:40 AM

सोलापुरातील एकूण रुग्णसंख्या पोहचली ५९० वर; आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : सोलापुरात मागील बारा तासात सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापुरात आता एकूण रुग्णांची संख्या ५९० झाली असून आतापर्यंत ५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापुरात मागील काही दिवसांपासून वाढत चाललेली रुग्णांची संख्या पाहता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. 

रविवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १०२ रुग्णांच्या तपासणी अहवालात सात जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.  आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९० झाली आहे. आत्तापर्यंत सोलापुरातील २५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

वाढता कोरोना संसर्ग  प्रादुर्भाव  टाळण्यासाठी उपाययोजना करत असताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे.

सोलापूर आजचा अहवालदि.25/05/20 सकाळी 8.00 

  • आजचे तपासणी अहवाल - १०२
  • पॉझिटिव्ह - ७ (पुरुष - ४ स्त्री - ३)
  • निगेटिव्ह - ९५
  • आजची मृत संख्या - १
  • एकुण पॉझिटिव्ह- ५९०,
  • एकुण निगेटिव्ह - ५०५५
  • एकुण चाचणी - ५६४५
  • एकुण मृत्यू - ५२
  • एकुण बरे रूग्ण - २५४
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस