शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ईव्हीएम वर व्यक्त केला संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:47 IST

सोलापूर: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकालानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतपत्रिकेवर विश्वास व्यक्त करीत ईव्हीएम मशीन संशोधनाचा विषय असल्याचे ...

सोलापूर: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकालानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतपत्रिकेवर विश्वास व्यक्त करीत ईव्हीएम मशीन संशोधनाचा विषय असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीचा हा सामूहिक विजय असला तरी मतपत्रिकेवर ही निवडणूक झाली हे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. मतपत्रिकेमुळे राजकारणाची वस्तुस्थिती लक्षात आली असून, भाजपला लाखाचे मताधिक्य देणारे ईव्हीएम मशीन आता संशोधनाचा विषय झाल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीतून ईव्हीएम मशीनचा खरा प्रकार समोर आला असून, भविष्यात सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच व्हायला हव्यात अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे आमदार शिंदे यांनी करमाळा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

माजी आमदार दीपक साळुंके यांनीही पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मतपत्रिकेवर मतदान झाल्याने आम्ही निर्धास्त होतो असे म्हटले आहे. बटनावर आमचा विश्वास नाही. राज्यात पाच उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आले. विरोधात असलेली मंडळी एकाच व्यासपीठावर आणल्याने हे यश आल्याचे त्यांनी नमूद केले.

हे तर मिरॅकल : देशमुख

ईव्हीएम मशीनवर निवडून आलेले आमदारच संशय घेत असतील तर हे मिरॅकल म्हणावे लागेल असे प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली. सोलापूर व पुणे जिल्ह्याने भाजपला साथ दिली. कोल्हापूर, सांगली व सातारा पट्ट्यात महाविकास आघाडीच्या पारड्यात जादा मते गेल्याचे दिसत आहे. त्यांची एकजूट व बऱ्याच शिक्षण संस्था राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या असल्याने हा फरक झाला असावा. आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू असेही ते म्हणाले.