शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
3
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
4
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
5
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
6
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
7
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
8
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
9
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
10
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
11
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
12
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
13
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
14
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
15
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
16
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
17
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
18
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
19
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
20
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत माने यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधी याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:24 IST

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांच्याकडे असलेला हिंदू कैकाडी जातीचा दाखला बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून ...

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांच्याकडे असलेला हिंदू कैकाडी जातीचा दाखला बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मिळविला असल्याची क्षीरसागर यांची तक्रार बुलडाणा जात पडताळणी समितीने फेटाळून लावली होती. या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचे पुर सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर खंडपीठात बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विरोधात दाखल केलेली याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे.

क्षीरसागर यांच्या विरोधात बुलडाणा जात पडताळणी समितीने आमदार यशवंत माने व त्यांचे बंधू हनुमंत माने याना दिलेला निर्णय नागपूर खंडपीठाने कायम ठेवत आ. माने यांना दिलासा दिला आहे. माने यांच्या शेळगाव (ता. इंदापूर) गावातील विलास देवराज भांगे यांनीही २०१७ मध्ये आ. माने यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळी समितीकडे तक्रार केली होती. या प्रकरणातदेखील भांगे यांची तक्रार ११ सप्टेंबर २०१८ ला समितीने आम्हाला एखाद्या झालेल्या निर्णयावर पुन्हा पुनर्निर्णय देता येत नाही, या मुद्द्यावर फेटाळली होती. त्यानंतरच सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर खंडपीठाकडे सदर जात पडताळणीच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (भटक्‍या जमाती), इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० नुसार व उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाड्यांनुसार समितीला पुनर्निर्णयाचे अधिकार प्राप्त नसल्याचे कारण देत समितीने क्षीरसागर यांची तक्रार निकाली काढली होती. या निकालाविरोधात नागपूर खंडपीठाकडे क्षीरसागर यांनी याचिका दाखल केली होती.