शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तळपत्या उन्हात आईची लेकरासाठी भटकंती; उन्हामुळे बाळाची रडरड...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 14:11 IST

सरकारी मदतच नाही; सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होतो संघर्ष

ठळक मुद्देशहरात मागील काही वर्षांपासून काही महिला या भिक्षा मागताना दिसत होत्यालॉकडाऊननंतर काही महिला आपल्या मुलांना घेऊन भिक्षा मागताना दिसत आहेतमागील तीन महिन्यांपासून काम नसल्यामुळे मुलांना तरी काय खाऊ घालायचं ?

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : होटगी रोड परिसरात सहज रस्त्यावरुन जाताना एक नजर टाकली की समोर दिसते लेकुरवाळी आई. आपल्या तान्हुल्या लेकराला घेऊन जेवणासाठी भटकंती करतेय. मागील तीन महिन्यांपासून काम नसल्यामुळे मुलांना तरी काय खाऊ घालायचं ? या प्रश्नाचे उत्तर शोधत ४३ ते ४४ अंश सेल्सिअस इतक्या तळपत्या उन्हात त्यांचा जगण्याशी संघर्ष सुरू आहे.

शहरात मागील काही वर्षांपासून काही महिला या भिक्षा मागताना दिसत होत्या. यातील बहुतांश महिला या परप्रांतीय होत्या. लॉकडाऊननंतर त्या त्यांच्या गावाकडे गेल्या असाव्यात. लॉकडाऊननंतर काही महिला आपल्या मुलांना घेऊन भिक्षा मागताना दिसत आहेत. 

या महिला बाहेरच्या नसून सोलापुरातीलच आहेत. विजापूर रोड येथील चैतन्य नगर शेजारी यांची वस्ती आहे. दगड फोडणे, लिंबू विकणे, फुगे विकणे आदी काम ते करत असतात. लॉकडाऊनमुळे खाण बंद झाली, त्यामुळे दगड फोडण्याचे काम गेले. दुकाने आणि बागा बंद असल्यामुळे लिंबू आणि फुगे विकता येत नाहीत. त्यामुळे भिक्षा मागण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय राहिलेला नाही.

सकाळी सहा वाजल्यापासून भटकंतीला सुरुवात होते. मंदिर, दर्गा, मस्जिद सारखी प्रार्थनास्थळे सध्या बंद आहेत. त्यामुळे जिथे लोक येतील तिथे या महिला जातात. 

शहरातील पेट्रोल पंप, बँक, एटीएम सेंटर ही भिक्षा मागण्याची ठिकाणे झाले आहेत. काही ठिकाणी सुरू असलेल्या किराणा दुकानासमोर उभे राहिल्यास तिथला ग्राहक खाण्यास देतो. 

सुरुवातीला शासन व सामाजिक संस्थांनी मदत काहीच दिवस केली. सर्वांना ही मदत मिळाली नाही. ज्यांच्याकडे दगड फोडण्याचे काम करतो त्यांनीही मदत केली नसल्याचे महिलेने सांगितले.

उन्हामुळे बाळाची रडरडही थांबत नाही- लहान असतानाच बाळाला चांगला आहार मिळाला तर तो सशक्त बनतो. त्यासाठी आईलाही चांगला आहार करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाळाला दूध मिळते व त्याची चांगली वाढ होते. चांगला आहार तर दूरच राहिला त्यांना दोनवेळचं जेवायला मोठ्या मुश्किलीने मिळत आहे. भर उन्हात फिरत असल्यामुळे बाळ नेहमी रडतच असते.  कुणाला दया आली तर काहीतरी मिळते. थोडे पैसे मिळाले तर दूध घेऊन बाळाला पाजले जाते. नागरिकही घराबाहेर पडत नसल्यामुळे भिक्षा मागूनही पोट भरत नसल्याचे या महिलांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस