शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

संकटकाळी मोबाईल शेक करताच त्वरित मिळणार मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 5:08 PM

तरुणी, महिलांच्या सुरक्षेसाठी अ‍ॅप : महिला दिनाला होणार लाँच

ठळक मुद्देमहिलांच्या सुरक्षेसाठी या अ‍ॅपमध्ये तीन गार्डीयनची (पालक) नावे अ‍ॅड करता येतातमोबाईल शेक किंवा होम स्क्रीनवरील बटन दाबल्यास आपण अडचणीत असल्याचा मेसेज जातोया अ‍ॅपमध्ये सायरनची देखील सोय आहे. सायरनचे बटन प्रेस केल्यानंतर मोठ्या आवाजामध्ये तो वाजतो

शीतलकुमार कांबळे सोलापूर : सार्वजनिक ठिकाणी, प्रवास करताना किंवा इतर कोणत्याही जागी तरुणी, महिलांवर एखादे संकट येऊ शकते. अशा वेळी लगेच मदतीसाठी संपर्क साधणे अवघड असते. ही अडचण लक्षात घेऊन सोलापुरातील एका युवकाने मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. आठ मार्च रोजी महिला दिनाच्या औचित्याने हे अ‍ॅप लाँच होणार आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी या अ‍ॅपमध्ये तीन गार्डीयनची (पालक) नावे अ‍ॅड करता येतात. संकटाच्या काळात या गार्डीयनला मोबाईल शेक किंवा होम स्क्रीनवरील बटन दाबल्यास आपण अडचणीत असल्याचा मेसेज जातो. या मेसेजसोबतच मोबाईलचे लोकेशनही जाते. यामुळे गार्डीयनला आपली मुलगी कुठे आहे याची त्वरित माहिती मिळते. या अ‍ॅपमध्ये सायरनची देखील सोय करण्यात आली आहे. सायरनचे बटन प्रेस केल्यानंतर मोठ्या आवाजामध्ये तो वाजतो. यामुळे तरुणीच्या आसपास असणाºया लोकांना याची माहिती मिळते. यावरून ते कमीत कमी वेळेत मदत करू शकतात. याचे सगळ्यात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या अ‍ॅपला इंटरनेटची गरज नाही. इंटरनेटशिवाय आपल्या पालक ांना संकटात असल्याची माहिती पुरविता येते.

या अ‍ॅपसोबत दामिनी पथकाला जोडून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दामिनी पथकातील पोलीस हे शहरामध्ये अनेक ठिकाणी गस्त घालत असतात. अडचणीच्या वेळी त्यांची मदत होऊ शकते. पुढच्या टप्प्यामध्ये शहरातील सर्व पोलीस ठाणे व पोलीस चौकी यांचा फोन क्रमांक या अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. जेणे करून एखाद्या विशिष्ट ठिकाणी जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलीस मदतीसाठी पोहोचू शकतील.

सोलापूरकरही करू शकतील मदतया अ‍ॅपमध्ये सेल्फ हेल्प हे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे. यात सोलापूरकरही मदत करू शकतील. मोबाईल अ‍ॅपच्या निर्मात्यांनी यासाठी सोलापूरकरांना आवाहन केले आहे. स्वयंस्फू र्तीने स्वयंसेवक काम करतील. अडचणीच्या वेळी अ‍ॅपच्या माध्यमातून पालकांपर्यंत मेसेज पोहोचला, पण ते तिथे येऊ शकत नसल्यास किंवा १० मिनिटांपेक्षा जास्त काळ गेल्यास सेल्फ हेल्प हे फीचर उपयोगी पडणार आहे. अ‍ॅपमध्ये असलेले नोंदणीकृत सदस्य हे त्या तरुणीच्या मदतीला जाऊ शकतील. घटनेच्या आसपास असणाºया स्वयंसेवकांना लगेच जाणे शक्य होते.

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलWomenमहिला