Mitkal as the taluka vice president of Maratha Seva Sangh | मराठा सेवा संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी मिटकल

मराठा सेवा संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी मिटकल

निवडीनंतर जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, माजी तालुकाध्यक्ष दिनेश जगदाळे, तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,जिल्हा संघटक प्रदीप पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व पुस्तके देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वराज्याची स्थापना आणि संत तुकोबारायांचे विचार : एक चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा. महादेव थोरात यांचा व इंडिया इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'भारत ज्योती' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दिनेश जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, करमाळा तालुका अध्यक्ष गणेश डोके,अरुण जगताप, महेश देशमुख यांनी कौतुक केले.

फोटो ओळ- ०८कुर्डुवाडी-मराठा सेवा संघ

माढा तालुका मराठा सेवा संघाच्या निवडी घेण्यात आल्या. त्यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष निलेश देशमुख व इतर पदाधिकारी.

----

Web Title: Mitkal as the taluka vice president of Maratha Seva Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.