शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जानकरांचे १६ हजारांचे मताधिक्य तोडत भाजपचे राम सातपुते विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 17:04 IST

Malshiras Vidhan Sabha Election Results 2019: माळशिरस विधानसभा मतदारसंघ; शेवटच्या क्षणी सातपुतेंनी विजयश्री आणला खेचून

ठळक मुद्देमाळशिरस विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लामतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीतच उत्तम जानकर यांनी २ हजार ६०१ मतांची आघाडी घेतलीअखेरच्या २२ व्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवत केवळ २७०२ मतांनी विजयी झाले

माळशिरस : पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेले राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचे १९ व्या फेरीपर्यंत १६ हजार ५९७ मतांचे लिड होते, मात्र हे लिड तोडत भाजपचे राम सातपुते यांनी आघाडी घेत शेवटच्या ४ फेरीपर्यंत ती टिकविले आणि अखेर २७०२ मताधिक्यांनी विजयी झाले.

माळशिरसविधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मात्र मोहिते-पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केला़ त्यानंतर मोहिते-पाटील गटाने आपला करिष्मा पक्ष बदलल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत दाखवून दिला. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या गटाचा उमेदवार विजयी होईल, असे चित्र होते. मात्र अखेरच्या क्षणी उत्तम जानकर यांनी भाजपशी फारक घेत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविली़ भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

२४ रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीतच उत्तम जानकर यांनी २ हजार ६०१ मतांची आघाडी घेतली. ती कायम ठेवत १२ व्या फेरीपर्यंत १६ हजार ६९७ मतांची आघाडी होती़ त्यानंतर १३ व्या फेरीनंतर त्यांच्या मतांची आघाडी कमी-कमी होऊ लागली़ १९ व्या फेरीत राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांच्यावर मात करीत ८५६ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी अखेरच्या २२ व्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवत केवळ २७०२ मतांनी विजयी झाले.

माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा निकाल सुरुवातीला उत्तम जानकर यांच्या बाजुने झुकत चालल्याने अकलूज, माळशिरस मध्ये सन्नाटा पसरला होता़ जेव्हा राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांची आघाडी तोडून पुढे गेल्यानंतर मात्र तालुक्यात सर्वत्र मोहिते-पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली.

टॅग्स :Solapurसोलापूरmalshiras-acमाळशिरसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकVotingमतदान