शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मजरेवाडी जि़ प. शाळेवरील पत्रे उडाले

By admin | Updated: May 28, 2014 01:37 IST

५ वर्ग खोल्यांसह पोषण आहार : मुख्याध्यापकांचे कार्यालय उघड्यावर

सोलापूर : मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी वार्‍याचा फटका सर्वसामान्यांच्या घरांबरोबर मजरेवाडीतील जि़ प़ शाळेला बसला आहे़ शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून जाऊन पाच वर्ग खोल्यांसह पोषण आहार आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय उघड्यावर आले असून आजच्या घटनेने शाळा इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍याचा पाऊस झाला़ मजरेवाडीतील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक कार्यालय, पाच वर्ग खोल्या आणि पोषण आहार खोलीवरील पत्रे उडून जाऊन सारे काही उघड्यावर आले आहे़ हे पत्रे दुसरा पाऊस येण्यापूर्वी बदलले नाहीत तर पोषणआहाराची नासाडी तर होणारच आहे, शिवाय तडा गेलेल्या भिंतीही कोसळणार आहेत़ परिणामत: काही दिवसात भरणारी शाळा ही मैदानावर उघड्यावर असेल़ या शाळेच्या बाजूला राहणार्‍या रहिवासी रईसा शेख यांना शाळेवरचे पत्रे उडताना दिसले़ पत्र्यावरचा मोठा दगड पडल्याने मुख्याध्यापकांच्या टेबलावरील काचेचे तुकडे-तुकडे झाले़ तसेच काही कागदपत्रे आणि दफ्तर भिजल्याचे निदर्शनास आले़ ही घटना शेजार्‍यांकडून कळताच मुख्याध्यापिका खुर्शिद शेख, बालवाडी शिक्षिका विनू गोफणे, मदतनीस मंजुषा गळवे या धावत आल्या़ शिपायाच्या मदतीने सारे साहित्य, दफ्तर आणि पोषण आहार बाजूला केले़ तसेच रात्रभर पाणी बाहेर काढून स्वच्छता करून घेतली़ २६ फे ब्रुवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेवरचे पत्रे अशाच प्रकारच्या वादळी वार्‍यात उडून विद्यार्थी जखमी झाले होते़ त्यामुळे इमारतीबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता़ सुदैवाने शाळांना सुट्ट्या असल्याने सुभाषचंद्र बोस शाळेची पुनरावृत्ती टळली़

-----------------------------

इमारत दुरुस्तीसाठी निधी नाही जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा इमारती या ५० वर्षांपूर्वीच्या आहेत़ आज या शाळा धोकादायक बनल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांची कालमर्यादा संपली तरी अशा शाळांच्या इमारती पाडून नवे वर्ग बांधून द्यायला शासनाकडे पैसे नाहीत़ किरकोळ दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत ५ हजार रुपयांची तरतूद असल्याचे सांगितले जाते, मात्र मोठ्या दुरुस्तीसाठी पैसेच उपलब्ध होत नाहीत़ नियमानुसार पडझडीचे फोटो दिले तरी त्यासाठी खास निधी लवकर उपलब्ध होत नाही़ २००४ पासून वेतनेतर अनुदानच बंद असल्याने अनेक शाळा अडचणीत सापडल्या आहेत़ २००४ पासून शासनाने वेतनेतर अनुदान बंद केल्याने शाळांच्या देखभालीवर कोण खर्च करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जातोय़

-------------------

जिल्ह्यातील जुन्या शाळांच्या दुरु स्तीबाबत काही दिवसांपूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले आहे़ त्यांच्यासाठी खास धोरण आखले आहे़ शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध होत आहेत़ त्यानंतर लगेच इस्टीमेटचा आधार घेऊन काम केले जाणार आहे़ तसेच गटशिक्षण अधिकार्‍यांमार्फत मजरेवाडी शाळेची माहिती घेऊन ती दुरुस्त करू. - राजेंद्र बाबर, शिक्षणाधिकारी़