शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

माढ्याच्या संजय शिंदे कुटुंबाची प्रचाराच्या रणधुमाळीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 15:55 IST

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक कुटुंब व असंख्य कार्यकर्त्यांची फौज कार्यकर्त्यांनाही प्रचारासाठी गावे वाटून दिली आहेतसकाळी उठल्यापासून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रांग लागलेली असते

इरफान शेख 
कुर्डूवाडी: माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक कुटुंब व असंख्य कार्यकर्त्यांची फौज आहे. कार्यकर्त्यांनाही प्रचारासाठी गावे वाटून दिली आहेत.   प्रचार दौरे, कॉर्नर सभा, सभा आदींची माहिती गावागावांत पोहोचवायची, ग्राउंड रिपोर्ट निमगावला द्यायचा, अशी एक ना अनेक कामे ते करीत आहेत.

सकाळी उठल्यापासून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रांग लागलेली असते. प्रत्येकाची भेट घ्यायची  गरज असल्यास त्यांना मंत्रालयात, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीत बोलवायचे व त्याचे काम करायचे.

उमेदवाराचे नाव । संजय शिंदे
सुमारे २५ ते ३० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कृउबाचे चेअरमन, पंचायत समिती सभापती,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम.

भाऊ। आ. बबनदादा शिंदे
गेल्या २५ वर्षांपासून आमदार, जिल्हा दूध संघाचे चेअरमन होते. माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांची नाळ त्यांच्याशी जोडली आहे.  भावासाठी ते अख्खा तालुका व संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

पुतण्या । रणजितसिंह शिंदे
तुर्कपिंपरी कारखान्याचे चेअरमन, माढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, विद्यमान जि.प.सदस्य अशा अनेक पदांवर ते कार्यरत आहेत.  तेही प्रचारासाठी संूपर्ण माढा मतदारसंघात सक्रिय आहेत.

पुतण्या । धनराज शिंदे
हे तालुका पंचायत सदस्य असून, सध्या ते पंढरपूर व सांगोला तालुक्यात चुलत्याच्या प्रचारासाठी फिरत आहेत.  यांचा जनसंपर्क मोठा असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा मोठा वाटा.

मुलगा। यशवंत शिंदे
विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक. त्यांचे उच्च शिक्षण परदेशात झाले आहे.  आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी ते करमाळा मतदारसंघात अगदी वस्तीवर फिरुन प्रचार करत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBabanrao Shindeबबनराव शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक