गुंगीचे औषध देऊन वृद्धेला लुटले

By Admin | Updated: May 3, 2014 14:45 IST2014-05-03T13:23:36+5:302014-05-03T14:45:19+5:30

सात रस्ता येथे लग्नाला आलेल्या वृद्धेस एका महिलेने चहातून गुंगीचे औषध देऊन अंगावरील 32 हजारांचे दागिने लुटून नेल्याची घटना गुरुवारी घडली.

Looted old man with a cure drug | गुंगीचे औषध देऊन वृद्धेला लुटले

गुंगीचे औषध देऊन वृद्धेला लुटले

सोलापूर : सात रस्ता येथे लग्नाला आलेल्या वृद्धेस एका महिलेने चहातून गुंगीचे औषध देऊन अंगावरील 32 हजारांचे दागिने लुटून नेल्याची घटना गुरुवारी घडली.
जिजाबाई जगन्नाथ शिंदे (73, रा. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात एक महिला व तिच्या सोबत असलेल्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिजाबाई या गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता त्या उपलप मंगल कार्यालयात लग्नासाठी आल्या होत्या. तेथे त्यांना एक महिला भेटली व तुम्ही मला ओळखले का, लग्नास अजून उशीर आहे, चला चहा घेऊ म्हणून बाहेर चौकात बोलावून नेले. चौकात एक मुलगा चहा घेऊन आला. चहा पिल्यानंतर चला शहाळ घेऊ असे ती म्हणाली. पण जिजाबाई यांनी शहाळ घेतला नाही. ती महिला शहाळ पीत असताना जिजाबाई यांना भोवळ आली. त्यानंतर ‘त्या’ महिलेनेच शिंदे यांना शासकीय व नंतर अश्विनी रुग्णालयात उपचारास दाखल केले. शुद्धीवर आल्यावर गळय़ातील मंगळसूत्र, कानातील फुले, अंगठी असा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात अज्ञात महिला व मुलाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Looted old man with a cure drug