शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्यात वीज कोसळून सासू-सून ठार

By admin | Updated: May 28, 2014 01:35 IST

सांगोला : सांगोला शहरांतर्गत पंढरपूर रोडवरील सावंत वस्ती या ठिकाणी वादळी वारे व पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली बसलेल्या चुलत सासू-सुनेवर अचानक वीज कोसळून त्या जागीच ठार झाल्या.

सांगोला : सांगोला शहरांतर्गत पंढरपूर रोडवरील सावंत वस्ती या ठिकाणी वादळी वारे व पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली बसलेल्या चुलत सासू-सुनेवर अचानक वीज कोसळून त्या जागीच ठार झाल्या. ही घटना मंगळवारी दु. ३.३० वा. च्या सुमारास घडली. इंदूबाई बंडू सावंत (वय ४५) व सुभद्राबाई सुखदेव सावंत (वय ५२, रा. सांगोला-सावंत वस्ती) अशी वीज पडून ठार झालेल्या सासू-सुनेची नावे आहेत. इंदूबाई सावंत, सुभद्राबाई सावंत व सुवर्णा सावंत या तिघी मुलीसह चुलत सासू-सुना मंगळवारी दु. ३ वा.च्या सुमारास गवत आणण्यासाठी घरापासून हकेच्या अंतरावरील शेतात गेल्या होत्या. गवत काढताना अचानक विजांच्या कडकडाटात वादळी वार्‍यासह पावसास सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी या दोघी झाडाखाली थांबल्या तर सुवर्णा भिजत घराकडे पळत गेली. इंदूबाई सावंत व सुभद्रा सावंत या दोघींवर अचानक वीज कोसळल्याने दोघी जागीच ठार झाल्या. यावेळी पाऊस थांबल्यानंतर सुवर्णा सावंत गवारीच्या शेंगा काढण्यासाठी शेतात जात असताना दोघी झाडाखाली झोपल्याचे पाहिले. यावेळी तिने दोघींना उठवण्याचा प्रयत्न केला असता कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. सुवर्णा हिनेच आरडाओरड करुन वस्तीवरील नातेवाईकांना बोलावून घेतले. दोघींनाही तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. पीयूष साळुंखे यांनी त्या मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची शिवाजी नामदेव सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सविता कलटवाड करीत आहे. शासकीय मदतीचे आश्वासन शहरातील सावंत वस्ती याठिकाणी वीज पडून महिला ठार झाल्याचे वृत्त समजताच आ. गणपतराव देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह शहरातील अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी आ. देशमुख यांनी घडल्या प्रकाराची माहिती घेऊन सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन महसूल कर्मचार्‍यांना रितसर पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच मृत पावलेल्या सावंत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले

. --------------------------

तर आई व चुलती वाचल्या असत्या दुपारी ३ वा.च्या सुमारास वातावरणात बदल झाल्याने वादळी वारे वाहू लागले. पावसाची चिन्हे दिसू लागल्याने श्रीमती इंदूबाई सावंत हिची मुलगी मैना हिने आई वारा सुटला आहे. पाऊस येऊ लागला आहे. गवत काढण्यासाठी जाऊ नको म्हणून मनाई केली होती; मात्र क्षणातच आपली आई व चुलती वीज पडून ठार झाल्याचे समजताच मुलगी मैनाने आई तू माझे का ऐकले नाही म्हणून हंबरडा फोडला. यावेळी उपस्थित महिला व नागरिकांना अश्रू अनावर झाले.