शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

मराठा आरक्षणासाठी माओवाद्यांच्या पाठिंब्याचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला धोकाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 19:36 IST

आमदार विनायक मेटे यांचा इशारा -  सात जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही 

सोलापूर-- उद्धव ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा व हलगर्जीपणाच मराठा आरक्षण रद्द करण्याला कारणीभूत ठरला आहे. मराठा आरक्षण सुनावणी ते स्थगितीपर्यंत व नंतर आरक्षण रद्द होण्याच्या कालावधीपर्यंत ठाकरे सरकारने अक्षम्य चुका केल्या आहेत. सुनावणीला उपस्थित न राहणे,भाषांतर न करणे,नको असलेली कागदपत्रे दाखविणे,योग्य वकील न दिल्याचे परिणाम आज मराठा समाजाला भोगावे लागत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाप्रश्नी ५ जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास ७ जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी दिला.

मराठा समाजाच्या मतांची ज्यांना गरज आहे त्या आमदारांनी आपापल्या पक्षाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणावा. विरोधी पक्षानेसुद्धा सरकारवर दबाव आणला पाहिजे जमत नसेल तर भाजपने शिवसंग्रामसोबत रहावे असे आमदार मेटे म्हणाले. 

मराठा आरक्षण जनजागृती राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने आमदार मेटे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार मेटे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठविली. उद्धव ठाकरे यांनी मराठा समजलं वेढ्यात काढले तर अशोक चव्हाणांनी मराठा समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप आमदार मेटे यांनी यावेळी बोलताना केला. 

मराठा समजाला खोटे बोलून फसविण्यात आले आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे तरुणांमध्ये सरकारविषयी प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. मराठा समाजाचा जणू सरकारने विश्वासघातच केल्याचे आमदार मेटे म्हणाले. उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम दिल्लीला धावतपळत गेली आणि धूम ठोकत मुंबईला आली. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत नेमका कोणता निर्णय झाला याचा तपशील बाहेर येणे गरजेचे आहे, असे सांगत ठाकरे सरकारच्या हातात जे आहे ते त्यांनी दिले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु असताना मात्र त्याला कोणताही प्रतिसाद दिला जात नाही असेही आमदार मेटे म्हणाले. मागासवर्गीय अयो स्थापन झाला पाहिजे. फेरविचार याचिका दाखल झाली पाहिजे. ओबीसी बांधवांना आरक्षण व सोयी - सवलती तसेच संरक्षण सवलती लागू झाल्या पाहिजेत. सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज भवन प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे अशी मागणीसुद्धा आमदार मेटे यांनी केली. प्रत्येक जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील-महामंडळ आणि सारथीचे विभागीय कार्यालय झाले पाहिजे असेही ते म्हणाले.  

शिवसंग्रामचे मूक नव्हे बोलके आंदोलन असणार 

मराठा आरक्षणप्रश्नी शिवसंग्राम संघटना मूक नव्हे तर बोलके आंदोलन करणार आहे. रस्त्यावरची आंदोलने असतील.५ जूनला बीडमधून संघर्ष मोर्चाची सुरुवात झाली आहे. २६ जूनला औरंगाबादेत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मेळावा घेण्यात येणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोलापुरात मेळावा होईल. ३६ जिल्ह्यात मेळावे झाल्यानंतर विभागीय मोर्चा होईल. त्यानंतर मुंबईत महामोर्चा  होऊन २७ जूनला मुंबईत जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.  

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षणVinayak Meteविनायक मेटेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAshok Chavanअशोक चव्हाण