शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लागण होऊ नये म्हणून तेलुगू भाषिक अंगणात लावताहेत दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 11:56 IST

पूर्व भागात नवा प्रकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, अंगणात दिवे लावून देवाकडे आपत्ती टाळण्यासाठी महिलांकडून प्रार्थना 

ठळक मुद्देबहुतांश महिला विडी कामगार अशिक्षित असल्याने त्यांना अंधश्रद्धेची लागण ग्रहण काळातदेखील असाच प्रकार पूर्वभागात सुरू होता कोरोनाची लागण होऊ नये म्हणून दिवे लावून प्रार्थना

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : पूर्व भागातील तेलुगू भाषिक अंगणात रांगोळी काढून दिवे लावताहेत़ घरात रात्री उशिरा पूजाविधी करताहेत़ तीन दिवसांपूर्वी काही मोजकेच लोक दिवे लावत होते़ आता दिवे लावणाºयांची संख्या वाढत आहे़ असे का करताहेत याबाबत विचारले असता कोरोनाची लागण होऊ नये म्हणून दिवे लावून प्रार्थना करत असल्याची माहिती पूर्वभागातील महिलांनी दिली.

यंदाच्या गुढीपाडव्यात कीड आहे़ एक मुलगा असलेल्या महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, त्याकरिता अंगणात दिवे लावून देवाकडे आपत्ती टाळण्याची प्रार्थना करत असल्याच्या भावना काही महिलांनी व्यक्त केल्या़ यापूर्वी ग्रहण काळातदेखील असाच प्रकार पूर्वभागात सुरू होता.

बहुतांश महिला विडी कामगार अशिक्षित असल्याने त्यांना अंधश्रद्धेची लागण वारंवार होत असल्याची भावना पूर्वभागातील सुशिक्षित युवकांनी व्यक्त केली आहे़ ही निव्वळ अफवा असून असा प्रकार नेहमी घडतो, असेही युवकांनी सांगितले़ नीलमनगर, दत्तनगर, जुने विडी घरकूल, शास्त्रीनगर, नवीन विडी घरकूल, सत्तर फूट रोड, अशोक चौक परिसरातील नागरिकांच्या घरासमोर दिवे लागलेले दिसताहेत.

गुढीपाडव्याची कीड़.. ही निव्वळ अफवा़..- याबाबत अधिक माहिती देताना पूर्व भागातील ज्येष्ठ पुरोहित वेणुगोपाल जिल्ला यांनी सांगितले, यंदाच्या गुढीपाडव्यात कीड आहे, अशी एक अफवा सोलापूर, पुणे, मुंबई आणि नगर परिसरात पसरली आहे़ एक मुलगा असलेल्या महिला शेजारील पाच घरांतील पाणी आणून अंगणात शिंपडावे आणि रांगोळी काढून दिवा लावावा, असे केल्यास कीड नाहीशी होते, अशी अफवा सर्वत्र फिरत आहे़ अशी अफवा वारंवार पसरते़ प्रतिवर्षी संक्रांतीला असा प्रकार आढळून येत होता, आता गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक दिवे लावताहेत़ हे चुकीचे आहे़ यात काही तथ्य नाही़ लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये़ कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही पुरोहित जिल्ला यांनी केले आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस