कासेगाव सोसायटीत सत्ताधार्‍यांचे वर्चस्व

By Admin | Updated: July 24, 2015 20:08 IST2015-07-24T20:08:19+5:302015-07-24T20:08:19+5:30

कासेगाव विकास सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी शंकर येणगुरे, दिलीप चौगुले गटाने बाजी मारली. नऊ जागांवर या गटाचे उमेदवार विजयी झाले.

Kasegaon society dominates power | कासेगाव सोसायटीत सत्ताधार्‍यांचे वर्चस्व

कासेगाव सोसायटीत सत्ताधार्‍यांचे वर्चस्व

 दक्षिण सोलापूर: कासेगाव विकास सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी शंकर येणगुरे, दिलीप चौगुले गटाने बाजी मारली. नऊ जागांवर या गटाचे उमेदवार विजयी झाले तर चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
येणगुरे-चौगुले गटाच्या शामल भारत चव्हाण, तनुजा शंकर येणगुरे, हणमंत लक्ष्मण चांभार, दत्तात्रय काटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी नऊ जागांसाठी मतदान झाले. येणगुरे- चौगुले गटाशी संजय चौगुले गटाचा सामना झाला. त्यात सत्ताधारी येणगुरे-चौगुले गटानेच बाजी मारली. सर्वच जागा जिंकून सोसायटीत वर्चस्व स्थापन केले. मतमोजणीतील विजयी उमेदवार - श्रीशैल भोज (३२0), लक्ष्मण ढेकळे (३४३), राहुल जाधव (३0४), संजय जाधव (३२३), तुकाराम जाधव (३१0), तुकाराम खारे (३१३), आप्पाराव पाटील (३११), शंकर वाडकर (३२0), म्हाळप्पा गुड्ड (३0४). निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मल्लिकार्जुन बदोले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Kasegaon society dominates power