शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुमठ्यात पुतण्याने केला काकाचा खून

By admin | Updated: June 1, 2014 00:46 IST

सोलापूर : पैशाच्या वादातून पुतण्याने धारदार शस्त्राने वार करून काकाचा खून केल्याची घटना शनिवारी सकाळी कुमठे येथील महालक्ष्मी मंदिरासमोर घडल्यामुळे खळबळ उडाली.

सोलापूर : पैशाच्या वादातून पुतण्याने धारदार शस्त्राने वार करून काकाचा खून केल्याची घटना शनिवारी सकाळी कुमठे येथील महालक्ष्मी मंदिरासमोर घडल्यामुळे खळबळ उडाली. शंकर घोडके (वय ५०) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मुलगा राहुल (२१) याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याचा काका बब्रुवान धोेंडिबा घोडके व त्याची मुले सुधीर बब्रुवान घोडके, सुजीत बब्रुवान घोडके यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर हे शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमाराला कुमठे गावातील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते मंदिरासमोरील पायरीवर बसले असताना मारेकर्‍यांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांचा पाय तोडण्यात आला. मान व पाठीवर वार झाल्यावर ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्यावर हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर मंदिरासमोर गर्दी जमली. माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पो. नि. राजेश शिंगटे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिराच्या पायरीवर रक्ताचे थारोळे होते व भोवताली चपला पडल्या होत्या. सुरुवातीला मारेकरी कोण हे समजेना म्हणून पोलिसांनी श्वानपथकास पाचारण केले. श्वानपथक मंदिर परिसरात घुटमळले. नातेवाईक जमा झाल्यावर खरी हकिकत समोर आली. आरोपी बब्रुवान हा शंकर यांचा छोटा भाऊ आहे. बब्रुवानने शेतात ठिबक संच बसविण्यासाठी शंकर यांच्याकडून दीड लाख रुपये उसने घेतले होते. बरीच वर्षे झाली तरी तो पैसे परत देण्याचे नाव घेत नव्हता. शंकर यांनी तगादा लावल्यावर त्यांच्यात करार झाला होता; पण तरीही बब्रुवान पैसे देत नव्हता. दहा दिवसांपूर्वी पैशावरून भांडण झाल्यावर बब्रुवान पुण्याला निघून गेला होता. तो परत आल्याचे कळताच शंकर हे सकाळी साडेसहा वाजता पैसे मागण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यांच्यात वाद झाल्यावर ते मंदिराकडे गेले. त्यांच्या पाठलागावर आरोपी आले व त्यांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. शंकर यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली आहेत. घटनास्थळी उपायुक्त सुभाष बुरसे, अश्विनी सानप, पो. नि. संदीप गुरमे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.