शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

इस्राईल पद्धतीने केली लागवड; दोन एकरांत घेतले ३६ लाखांचे पेरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 11:00 IST

वाणेवाडीतील खंडेराय लवांड युवा शेतकºयाची यशोगाथा; पत्नीच्या मदतीने शेतीत केला वेगळा प्रयोग

ठळक मुद्देपरंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पर्यायी पिके घेऊन अधिक उत्पन्न पेरुसाठी मनुष्यबळ आणि लागवड खर्चही कमी निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे

संजय बोकेफोडे 

कुसळंब : निसर्गाची वारंवार हुलकावणी़़़ शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव़़़़वडिलार्जित २६ एकरांत पारंपरिक पिकाशिवाय फारसे काही पिकायचे नाही़़़सीताफळाला फाटा देत दोन एकरांत थाई वाणाच्या पेरुची लागवड केली़ एक एकरात १८ लाखांचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे वाणेवाडी(ता़ बार्शी) येथील एका युवा शेतकºयाने.

खंडेराव दत्तात्रेय लवांड असे त्या युवा शेतकºयाचे नाव आहे़ बार्शी तालुक्यातील कुसळंबपासून चार किलोमीटरवर वाणेवाडी हे गाव आहे़ गावातील शेतकºयांचा सारा कल सीताफळ लागवडीकडे आहे़ परंतु खंडेराव लवांड यांनी पत्नी जयश्रीच्या मदतीने शेतात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला़ त्यांनी थाई वाणाच्या पेरूची लागवड करुन एकरी १८ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. प्रथम सात किलोमीटर अंतरावर बाभळगाव येथील विहिरीतून पाईपलाईन करुन पाण्याची व्यवस्था केली.

शासनाचे कोणतेही अनुदान न घेता दोन वर्षांपूर्वी ‘थाई’ वाणाच्या पेरुची लागवड केली. पहिल्याच वर्षी त्यांनी एकरी सहा लाखांचे उत्पादन मिळवले़ अतिशय कमी खर्च आणि कमी मनुष्यबळात सीताफळापेक्षाही दुपटीने उत्पादन मिळाले़ संपूर्ण तालुक्यात थाई वाणाच्या पेरूची पहिली बाग फुलविण्याचा प्रयोग युवा शेतकरी खंडेराव यांनी केला़ थाई वाणाचा प्रसार इतका झाला की बाजारपेठेत जाण्याऐवजी बाहेरील व्यापारी बांधावर येऊन ४० रुपये दराने फळं घेतली़ त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाचला़ त्यामुळे एकरी १८ लाखांचे उत्पादन मिळाले़ मात्र एका एकरावरील लागवडीला सरासरी एक लाख रुपये खर्च आला.

 या लागवड खर्चात ५० हजार हे मशागत आणि फवारण्यांसाठी तर ५० हजार रुपये मजुरीवर खर्ची झाले. पेरूच्या झाडांना कॅल्शियम पोटॅश मायक्रोन्यूबची आवश्यकता असते़ या पेरूच्या बागेवर भुरी व मिलीबग हे रोग पसरतात. या फळात बिया नरम असतात हे या फळाचे वैशिष्ट्य़ पेरूचे वरील आवरण जाड असल्याने हे फळ काढणीनंतर जवळपास २० दिवस टिकून राहते़ तसेच त्यात गराचे प्रमाण जास्त असून, चवीला अतिशय गोड आहे. या पेरुची विक्रीही सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे़ स्थानिक पातळीवर बार्शी बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात हा पेरू विकला जातोय.

इस्राईल पद्धतीने लागवड - दोन ओळींमधील अंतर दहा फूट तर दोन झाडांमधील अंतर पाच फूट राखून पेरुची लागवड केली़ एका एकरात ८०० रोपे लावली़ ही सर्व लागवड इस्राईल पद्धतीने केली़ त्यांनी दोन एकरांत १६०० रोपे लावली़ केवळ सहा महिन्यांतच फळधारणा होण्यास सुरुवात झाली़ झाडं एक वर्षाची झाली आणि प्रत्येक झाडाला ४० ते ४५ किलो उत्पादन निघाले़ दुसºयाच वर्षी प्रत्येक झाडाला किमान १०० किलो माल निघाला़ सुरुवातीला दर ६० रुपये मिळाला़

निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते़ यात आर्थिक गणित कोलमडते़ त्यामुळे शेतकºयांनी परंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पर्यायी पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवावे़ पेरुसाठी मनुष्यबळ आणि लागवड खर्चही कमी आहे़ त्यातून नफा जास्त मिळतो आहे़ शेतकºयांनी बाजारपेठेतली गरज ओळखून पिके घ्यावीत़ - खंडेराय लवांड पेरु उत्पादक, वाणेवाडी 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार