शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मज लागली विठुरायाची ओढ....

By admin | Updated: July 8, 2014 00:44 IST

वारकऱ्याचा आवाज

कुरुल: सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवून मुखी विठुनामाचा गजर करीत गेल्या ५० वर्षांपासून पंढरपूर वारी करीत असलेल्या वारकऱ्याचा आवाज शेवटचा ठरला. एस. टी. स्टँडवर पाठीमागून ठोकरल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. या वारकऱ्याचे नाव सीताराम तुकाराम भोसले (वय ७४, रा. अंकोली ता. मोहोळ) असे आहे.अंकोली येथील सीताराम भोसले हे गेल्या ५० वर्षांपासून विठ्ठल भक्तीच्या ओढीने पंढरपूर वारी करीत असे. ही परंपरा त्यांचे वडील तुकाराम परशुराम भोसले यांच्यापासून आहे. हे भोसले घराणे मूळचे खवणीचे. ते अंकोलीला स्थायिक झाले. संपूर्ण घर शाकाहारी आणि वारकरी. ते स्वत: प्रत्येक महिन्याच्या एकादशीला वारीसाठी पंढरपूरला जात. आज सकाळी अंकोलीहून कोथाळे-पंढरपूर या एस. टी. ने. ७.४५ वाजता पंढरपूर येथे गेले. तेथील नवीन स्टँडवर उतरल्यावर लघवीसाठी पाठीमागील बाजूस गेले असताना यवतमाळ डेपोच्या एस. टी. ड्रायव्हरने (एम. एच. ०४ वाय ५७१२) गाडी रिव्हर्स घेत असताना पाठीमागे उभे असलेल्या भोसले यांना जोरात ठोकर दिली. त्यामुळे त्यांच्या उजव्या पायावरुन व कमरेवरुन ड्रायव्हर साईडचे चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले.ऐन आषाढी वारीच्या काळात पंढरपुरातच एका वृद्ध विठ्ठल भक्तावर काळाने घाला घातला. यामुळे अंकोलीतील त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ शोकाकुल झाले होते. अत्यंत मनमिळावू व धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.वारकरी सीताराम भोसले यांची वडिलांपासून चालत असलेली वारीची परंपरा आता त्यांचा मुलगा लक्ष्मण हा पुढे चालविणार आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच विठ्ठलाच्या भक्तीची ओढ आहे. विशेष म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीबरोबर त्यांचे कुटुंब देशसेवेत आहे. कारण त्यांचा मुलगा लष्करी सेवेतून निवृत्त झाला आहे तर दुसरा मुलगा सध्या भोपाळ येथे लष्करात आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.