घरकाम करणाऱ्या महिलांचा गृहिणींनी केला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:24 IST2021-03-09T04:24:56+5:302021-03-09T04:24:56+5:30

क्रांती महिला मंडळाच्यावतीने प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या ...

Housewives honored housewives | घरकाम करणाऱ्या महिलांचा गृहिणींनी केला सन्मान

घरकाम करणाऱ्या महिलांचा गृहिणींनी केला सन्मान

क्रांती महिला मंडळाच्यावतीने प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचना लक्षात घेऊन या महिला मंडळाच्यावतीने सार्वजनिक कार्यक्रम टाळून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यंदा कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने महिला मंडळाने जागतिक महिला दिनानिमित्त मंडळाच्या सर्व सदस्यांनी आपापल्या घरी ७ मार्च रोजी घरात घरकामास येणाऱ्या व कायम उपेक्षित असणाऱ्या कष्टकरी महिलांचा साडी, मिक्सर, फ्राय पॅन अशा संसारोपयोगी वस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

या निमित्ताने घरमालक आणि घर कामगार महिला यांच्यातील संवाद अधिक वृद्धिंगत झाला. या कष्टकरी महिलासुद्धा या सन्मानाने भारावून गेल्याचे दिसून आले.

मंडळाच्या अध्यक्षा सीमा सुरेश कोठारी, संस्थापिका राणी दोशी व निलम कोठारी, खजिनदार दीपा शहा, कार्यवाहक ज्योती शहा आदींसह मंडळाच्या ३५ सदस्यांनी आपापल्या घरी हा सन्मान कार्यक्रम साजरा केला.

---

क्रांती महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमा कोठारी स्वतःच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेचा भेटवस्तू, साडी देऊन सन्मान करताना दिसत आहेत.

Web Title: Housewives honored housewives