गॅसचा स्फोट होऊन चार दुकाने जळाली

By Admin | Updated: June 25, 2014 01:32 IST2014-06-25T01:32:33+5:302014-06-25T01:32:33+5:30

वैराग बाजारपेठेवर शोककळा

Four shops were burnt in the gas explosion | गॅसचा स्फोट होऊन चार दुकाने जळाली

गॅसचा स्फोट होऊन चार दुकाने जळाली



वैराग: येथील केसरी चौकातील सोन्याच्या दुकानातील गॅसचा स्फोट होऊन सोन्याचे दुकान जळून खाक झाले. त्याचवेळी याची झळ बसून शेजारील चार दुकानांना आग लागत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. पाच वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील सोन्या-चांदीचे दागिने तयार करणाऱ्या कारागिराच्या दुकानात दागिने बनविण्याचे काम सुरू होते. अचानक लहान सिलिंडरमधील गॅस बाहेर येऊन मजल्याच्या छतापर्यंत गेला व संपूर्ण दुकानाने आगीने पेट घेतला.
कारागिराने पळ काढल्याने जीवितहानी टळली. याचदरम्यान शेजारी असणारी दुसरी गॅसची टाकी जळाल्याने हे दुकान जळून खाक झाले. शेजारील सतीश टेलर्स या कापडाच्या दुकानातील कपडे व फर्निचरने पेट घेतला. त्यांचे साहित्यही मोठ्या प्रमाणात जळाले.
बार्शी येथून अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत वैराग पोलिसांमध्ये झालेली नव्हती.

Web Title: Four shops were burnt in the gas explosion