ओमनी- ट्रक अपघातात फलटणचे चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:17 IST2019-06-01T12:14:43+5:302019-06-01T12:17:15+5:30
पंढरपूरजवळील वाखरीजवळ झाला अपघात; जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

ओमनी- ट्रक अपघातात फलटणचे चार जण जखमी
पंढरपूर : पंढरपूरहुन वेळापूरकडे निघालेली ओमिनी आणि अकलूजहुन पंढरपूरकडे येणारा ट्रक यांच्यात अपघात होऊन चार प्रवासी जखमी झाले़ ही घटना शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास वाखरी (ता. पंढरपूर) येथे घडली.
१ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ओमिनी पंढरपूरहून पुण्याकडे निघाली होती. ती ओव्हरटेक करत असताना समोरून येणाºया ट्रकला जोरदार धडक होऊन अपघात झाला. ओमिनीमध्ये एकूण सहा प्रवासी होते. त्यापैकी मनोहर देशपांडे (वय ६५), प्रकाश देशपांडे (वय ७४), प्रभा प्रकाश देशपांडे (वय ६५), रणजीत विश्वास जाधव (वय २८) हे चौघे जखमी झाले. या सर्व जखमींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले.