शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; गड्या आपला गाव बरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:24 IST

राजकीय टोलेबाजी...अन गप्पा

महेश कुलकर्णी

हावरटवाडीचा हणम्या आज भलताच खुश होता. आनंदाने शिळ मारत घरातून बाहेर पडला. रस्त्यात पारावर नेहमीप्रमाणे तात्या ऊन खात बसले होते. 

हणम्याला पाहून तात्यांनी आवाज दिला, अरे हणमा... कुठं निघाला... अन् काय आज लईच खुशीत हायंस... काय इशेष...हणम्या आनंदातच म्हणाला... तात्या, आपले सगळे प्रॉब्लेम सॉल होणार... तात्या - कसं काय रं बाबा...हणम्या - अहो, सरकारने संकल्पपत्र का काय ते जाहीर केलं आहे मनं... त्यात पाच वर्षात एक कोटी नोकºया देणार असल्याचं सांगितलं आहे. आता पारावर चकाट्या पिटत बसायची वेळ येणार नाही म्हणून मी बी लई खुश आहे...तात्या - अरं लेका, लई झ्याक झालं की...हणम्या : आता जातो शहराला... रोजगारबी मिळंल... अन् पोट भरण्यासाठी दहा रुपयात ‘ताट’ बी आहेच की!तात्या : जा बाबा... लई भारी होईल... आपल्या गावातली बाकी पोरंबी हळूहळू न्हे.(काही दिवसांनी हणम्या शहराच्या ठिकाणी नोकरी मागायला गेला)

ठेवणीतील संदुक (पेटी) घेऊन हणम्या शहरात पोहोचला. मुंबईच्या ‘वाघा’नं दहा रुपयात जेवण देणार असं जाहीरनाम्यात सांगितलं होतं... हे हणम्याला ठाऊक होतं. दहा रुपयात जेवण करण्यासाठी तो निघाला.. एका हॉटेलमध्ये आला... मालकाला म्हणाला, मालक सरकारनं दहा रुपयात जेवण देणार असं सांगितलं होतं, ते द्या की! वेटर थोड्या वेळाने ताट घेऊन आला... रिकामंच ताट.. हणम्याने विचारले हे काय?, वेटर म्हणाला, दहा रुपयात नुसतं ताटच मिळतंय... जेवायला वेगळे पैसे द्यावे लागतील! 

उत्तर ऐकून हणम्या जाहीरनाम्याच्या नावावर कटाकटा बोटं मोडत तिथून उठला, तडक निघाला रोजगार शोधायला. रस्त्यात एका कारखान्यावर पोहोचला... तिथं जाऊन ‘सरकारने रोजगार देणार म्हणून आम्हास्नी सांगितलं होतं... काही काम हाय कां? असे आॅफिसमध्ये काम करणाºयाला विचारले... अधिकारी म्हणाला, अहो आर्थिक मंदीमुळे अर्धे कामगार आम्ही कपात केले आहेत. तुम्हाला कुठून काम द्यायचे? दुसºया ठिकाणी गेला तिथंबी कामगार कपातच सुरू होती. त्यानंबी तेच सांगितलं.... आता मात्र हणम्याला घामच फुटला... दहा रुपयात ‘ताट’बी नाही रोजगारबी नाही... हे संकलपत्र म्हणजे काय प्रकार आहे, त्याच्या लक्षात आले. आता सरळ आपले गाव गाठलेले बरे म्हणून त्याने गावाकडे जाणारी गाडी धरली.

गावात पोहोचल्यावर हणम्या दुसºया दिवशी पुन्हा पारावर आला. तंबाखूचा बार चोळत तात्या बसले होते. ऐंशी वर्षांच्या तात्याच्या चेहºयावर निर्विकार भाव होते. जणू त्यांना हणम्याचं जाणं आणि लगेच माघारी येणं आधीच माहीत होतं... तात्याने विचारले, काय झाला हणमा ? माघारी का आलास...

हणम्या म्हणाला, तात्या! काय हो, ते सरकार आणि काय तो जाहीरनामा, वचननामा अन् संकल्पपत्र... काम मागायला गेलो तर मंदी हाये म्हणत्यात... जेवण मागायला गेलो... तर दहा रुपयात येत नाही म्हणत्यात...! हे सगळं नको गड्या आपला गाव बरा, म्हणून गावाकडे आलो अन् थेट गेलो शेतात.. आपलं शेतीचं कामच लई भारी म्हणून गेलो तर काय लाईटच नाही... मायबाप सरकार, बारा तास शेतीला लाईट देतो म्हणलं पण तेबी न्हाई... आता पुन्हा पारावर बसायची येळ आलीय बघा! 

तात्या म्हणाले : अरे, हणम्या, गेल्या साठ वर्षांपासून मी हेच पाहतोय. निवडणुकीत बोलल्यालं आजपर्यंत कधी खरं झालं नाही... आस्वासन द्यायचं अन् ते खरं व्हायचं नाही, ही बघायची मलाबी सवय झाली, पण यावेळी म्हनं कोणाला तरी ‘भारतरत्न’ द्यायचंबी आस्वासन दिलंय... हे मात्र लईच झालंय गड्या !

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक