सोलापुरातील काँग्रेसचे माजी खासदार गंगाधर कुचन यांचे निधन; सायंकाळी होणार अंत्यसंस्कार
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 12, 2026 09:39 IST2026-05-12T09:39:11+5:302026-05-12T09:39:37+5:30
गंगाधरपंत कुचन यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक प्रश्नांवर काम करत जनतेशी कायम जवळीक ठेवली होती.

सोलापुरातील काँग्रेसचे माजी खासदार गंगाधर कुचन यांचे निधन; सायंकाळी होणार अंत्यसंस्कार
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : माजी खासदार गंगाधरपंत सिद्रामप्पा कुचन यांचे मंगळवार, दि. १२ मे रोजी पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले. ते गेल्या दहा दिवसांपासून आजारी होते. शहरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गंगाधरपंत कुचन यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक प्रश्नांवर काम करत जनतेशी कायम जवळीक ठेवली होती.
त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले, नातू-नातवंडे असा मोठा परिवार आहे. सायंकाळी पाच वाजता मेडिकल कॉलेज ला देहदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुतणे भास्कर कुचन यांनी दिली आहे.
हैद्राबाद रोड विडी घरकुल च्या माध्यमातून पूर्व भागातील विडी कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यात सिंहाचा वाटा होता. याचे त्यांनी त्यांच्या हयातीत कधीच श्रेय घेतले नाही.