कोरोनामुळे पुन्हा पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:20+5:302020-12-05T04:41:20+5:30

महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांत ७५२ चाचण्यांमधून ३६ रुग्ण आढळून आले. ५१ जणांनी कोरोनावर मात केली. मरण पावलेली व्यक्ती ...

Five more died of corona | कोरोनामुळे पुन्हा पाच जणांचा मृत्यू

कोरोनामुळे पुन्हा पाच जणांचा मृत्यू

महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांत ७५२ चाचण्यांमधून ३६ रुग्ण आढळून आले. ५१ जणांनी कोरोनावर मात केली. मरण पावलेली व्यक्ती गदगी नगर, जुने विडी घरकूल हैदराबाद रोड भागातील ४७ वर्षीय पुरुष आहे. शहरात अद्यापही १११ जण होम क्वारंटाईन आहेत तर ६४ जण इन्स्टिट्यशूनल क्वारंटाईन आहेत. ४२ जण घरात राहूनच उपचार घेत आहेत.

ग्रामीण भागात २०२८ चाचण्यांमधून १६२ रुग्ण आढळून आले. १७५ जणांनी कोरोनावर मात केली. मृतांमध्ये माळशिरस येथील ७५ वर्षीय पुरुष, वांगी नं. १ ता. करमाळा येथील ७५ वर्षीय महिला, माळशिरस येथील ८१ वर्षीय पुरुष, भाळवणी ता. पंढरपूर येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ग्रामीण भागात अद्यापही ११ हजार ९९५ जण होम क्वारंटाईन आहेत. ३९७९ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत.

जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या झाली १६०८

ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ७४० झाली. यापैकी ३३ हजार ०६३ जणांनी कोरोनावर मात केली. अद्यापही १६३२ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या १०४५ झाली आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १० हजार ४४२ झाली आहे. यातील ९ हजार ४५९ जणांनी कोरोनावर मात केली. अद्यापही ४२० जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या ५६३ झाली आहे.

Web Title: Five more died of corona