शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

आधी पंढरपूर-आळंदीची पाहणी, मग मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर आळंदी वारीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:47 IST

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे व संत चोखामेळा महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर ...

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे व संत चोखामेळा महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, पंढरपूर हे राज्याचे गौरवस्थान आहे. वारकरी ही संस्कृती आहे. पंढरपूर देवस्थान, विकास व व्यवस्थेचे भविष्यात काही नुकसान होणार नाही. त्या संदर्भात विधानभवनात बैठक होईल. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी, वारकरी व अन्य मंडळी उपस्थित राहतील, असे पटोले यांनी सांगितले.

अधिवेशनासाठी नवीन नियमावली

सध्या कोरोनाचे संकट संपले नाही. अधिवेशनासाठी जादा लोक येतील. अनेक प्रश्नांवर लोक एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. परंतु दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही. यामुळे अधिवेशन कामकाज जादा कालावधीत कसे चालेल, यासाठी नवीन नियमावली कशी करता येईल यावर चर्चा सुरू आहे.

----

केंद्र सरकारने तोडगा काढावा

केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात, शेतमजुरांच्या विरोधात कृषीविषयक विधेयक पास केले आहे. मजूर व इतर शेतीसंबंधित कामगार यांच्याविरोधात विधेयक पास केल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे. त्या अनुषंगाने दिल्लीमध्ये सर्व राज्यातून जो शेतकरी वर्ग जमा झाला आहे, यावर केंद्र सरकार तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.