शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात शनिवारी दिला जाणार काेरोनाचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:25 IST

कोविन अ‍ॅपवर यादी संकलित करण्यात आली आहे. आरोग्य सेवेशी संबंधित १०० जणांना लस देण्यात येणार आहे. लस देण्यात येणाऱ्या ...

कोविन अ‍ॅपवर यादी संकलित करण्यात आली आहे. आरोग्य सेवेशी संबंधित १०० जणांना लस देण्यात येणार आहे. लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांला रजिस्टर मोबाईल नंबरवर एक दिवस अगोदर वेळ व ठिकाणची माहिती देणारा संदेश येणार आहे. यासाठी संबधितांनी नोंदणी करताना जे ओळखपत्र जोडले आहे ते घेवून यावे. लाभार्थी लसीकरण कक्षात आल्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतरच त्यांना लसीकरण केले जाणार आहे. कोविड लस ही २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवावी लागते. यामुळे लस ठेवण्यासाठी रेफ्रीजेटरची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने लसीकरणाच्या ठिकाणी लसीकरण कक्ष, निरिक्षण कक्ष तसेच रुग्णवाहिका सेवा सुसज्ज ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, अशा सूचनाही सचिन ढोले यांनी दिल्या.

भीती, गैरसमज बाळगू नये

लसीकरण केल्यानंतर संबधितांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली अर्धा तास निरिक्षण कक्षात ठेवण्यात येणार आहे. लाभार्थी लसीकरण करुन घरी आल्यानंतरही त्यांना काही त्रास झाल्यास उपचार देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय व खाजगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबधितावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तत्काळ उपचार केले जाणार आहेत. याबाबत कोणतीही भीती अथवा गैरसमज बाळगू नये, असे आवाहनही डॉ. एकनाथ बोधले व डॉ. अरविंद गिराम यांनी केले आहे.

फोटो लाईन ::::::::::::::::::::::

कोरोनाची लस उपजिल्हा रुग्णालयात घेऊन येताना वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी.