भाळवणीत फटाके कारखान्यात स्फोट; जिवितहानी नाही, शेतकºयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:19 IST2019-05-08T12:18:19+5:302019-05-08T12:19:29+5:30
मंगळवेढा तालुक्यातील घटना; परिसरातील घराला गेले तडे

भाळवणीत फटाके कारखान्यात स्फोट; जिवितहानी नाही, शेतकºयांचे नुकसान
मंगळवेढा : भाळवणी (ता.मंगळवेढा) येथील सागर फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्यात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला़ या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरातील शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे सागर फायर्स वर्क्स फटाका कारखाना आहे़ या कारखान्यात नियमितपणे फटाके तयार करण्यात येतात़ दरम्यान, बुधवारी सकाळी सातच्या सुमारास कारखान्यात असलेल्या चार खोल्यात अचानक स्फोट झाला़ या स्फोटात जवळच्या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यांच्या घराला तडे गेले आहेत़ काम सुरु झाले नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली़ काही वर्षापूर्वी याच फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्यानंतर खूप मोठी जीवितहानी झाली होती.
गेल्यावर्षी स्फोट झाला, त्यावेळी सोमवारचा आठवडा बाजार असल्याने कामगार बाजारासाठी गेले होते़ त्यामुळे अनेक कामगारांचा जीव वाचला होता़ बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान स्फोट झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली़ स्फोट झाल्याने तब्बल तीस किलोमीटरपर्यंत या स्फोटाचा आवाज आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.