शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीचे सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ. भगवान नेने काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 20:23 IST

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सायंकाळी 6.38 वाजता डॉ. नेने यांनी अखेरचा श्वास घेतला.

सोलापूर - जिल्ह्यातील नामवंत कर्करोग तज्ञ आणि बार्शीच्या नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटलचे संचालक डॉ. भगवान उर्फ शरद नेने यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. बार्शीचे दुसरे भगवंत  अशी त्यांची बार्शी तालुक्यासह वैद्यकीय क्षेत्रात ओळख होती. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच बार्शी शहरात शोककळा पसरली आहे. 

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सायंकाळी 6.38 वाजता डॉ. नेने यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. नेने यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 11 वाजता बार्शीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. बार्शीतील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या वेद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग करिअरचा त्याग करून केवळ ग्रामीण भागातील रुग्णांसाठी त्यांनी लंडन ते बार्शी असा उलटा प्रवास केला. बार्शीला वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम नेने यांनी केलं. त्यामुळेच, बार्शी तालुक्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या शब्दाला मोठं महत्व होतं. 

डॉ. नेनेंच्या निधनाची बातमी समजताच बार्शी तालुक्यात शोककळा पसरली. बार्शीतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाद्वारे डॉ. नेने यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच, जुन्या-जाणत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.  

टॅग्स :Solapurसोलापूरdoctorडॉक्टरDeathमृत्यू