डॉ़ आंबेडकर यांना घरीच राहून अभिवादन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:21+5:302020-12-05T04:46:21+5:30

सोलापूर : राज्यासह सोलापूर शहरात कोरोनाचे मोठे संकट उभे आहे़ यामुळे सर्व अनुयायांनी यंदा महापरिनिर्वाण दिनी घरी राहूनच डॉ़ ...

Dr. Ambedkar should be greeted at home | डॉ़ आंबेडकर यांना घरीच राहून अभिवादन करावे

डॉ़ आंबेडकर यांना घरीच राहून अभिवादन करावे

सोलापूर : राज्यासह सोलापूर शहरात कोरोनाचे मोठे संकट उभे आहे़ यामुळे सर्व अनुयायांनी यंदा महापरिनिर्वाण दिनी घरी राहूनच डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासन व महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी पार्क चौक, न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान याठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी जमतात. तसेच चैत्यभूमी दादर येथे हजारो अनुयायी सोलापुरातून जातात. चैत्यभूमी दादर येथील कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने दादर येथेही न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनामुळे यंदा प्रातिनिधीक स्वरुपात संस्था तसेच संघटनांतील प्रत्येकी ५ जणांना अभिवादन करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याकडून पास घेणे बंधनकारक असणार आहे. प्रत्यक्ष अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी प्रार्थनास्थळी येण्याचे टाळावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Dr. Ambedkar should be greeted at home