शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याकांचा दर्जा नको, आरक्षण द्या

By admin | Updated: July 7, 2014 01:16 IST

मनोहर धोंडे : ‘शिवा’ संघटनेची बैठक

सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळणार असल्याचे गाजर दाखवले जात आहे. वास्तविक हा दर्जा मिळणार नाही, हे आम्हाला माहीत आहे. त्याऐवजी समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, अशी मागणी करीत ‘शिवा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी करीत जो पक्ष आम्हाला न्याय देईल त्यांच्याच पाठीशी संघटना उभी राहील, असे स्पष्टीकरणही दिले. ‘शिवा’ अ. भा. वीरशैव युवक संघटनेच्या वतीने लिंगायत ओबीसी आरक्षण हक्कासंदर्भात आयोजित बैठकीस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर आ. विजयकुमार देशमुख, संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, शहराध्यक्ष शिवानंद हिप्परगी, पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रशांत शेटे, उमाकांत शेटे, कर्नाटकाचे प्रांत सदस्य मल्लिकार्जुन आरबळे, राजेंद्र कुलकर्णी, शिवराम कमलापुरे, सतीश कानडे, कलंत्रीअप्पा उपस्थित होते. प्रा. धोंडे म्हणाले, १९९९ साली आम्ही वीरशैव धर्मास मान्यता मिळण्याची मागणी केली होती. त्याचवेळी देशभरातून २०० जणांनी वेगवेगळ्या धर्माची मागणी पुढे आणली होती. चर्चेनंतर तशी मान्यता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. धर्माची मान्यता मिळणार नसेल तर अल्पसंख्याकाचाही दर्जा मिळणार नाही, असे असताना समाजाला दर्जा मिळण्याचे गाजर दाखवले जात आहे. तशी आमची मागणीही नाही. समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. तुम्ही आम्ही कुठे आहोत. समाज कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करून उमाकांत शेटे यांनी समाजाची अधोगती होत असल्याची चिंता व्यक्त केली. समाजाला कुठल्याच सवलती नाहीत. व्यापार, उद्योग करावा म्हटले तर अर्थसाहाय्य नाही. पंचाचार्य आणि विरक्त यांच्या वादातच आपण बसलो आहोत. आता मनोहर धोंडे यांना बळ दिल्याशिवाय समाजाचा विकास होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी आ. विजयकुमार देशमुख, अरविंद पाटील, राजेंद्र कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत शेटे आदींची भाषणे झाली. तत्पूर्वी उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी समाजाच्या व्यथा मांडल्या. यावेळी मल्लिनाथ उणदे, श्रीशैल गुरगुरे, शंकर उणदे, नानासाहेब देशमुख, बसवराज बिराजदार, शांतेश्वर गुंते आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.-------------ना मागणी, ना निवेदन काकासाहेब कोयटे आणि सुनील रुकारी यांच्या संघटनेने वीरशैव लिंगायत समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, याबाबत कधीच मागणी केली नव्हती ना साधे निवेदनही दिले नव्हते, असा आरोप मनोहर धोंडे यांनी केला.