शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वादळी पावसाचे तीन बळी

By admin | Updated: May 28, 2014 01:07 IST

पत्रे उडाले : अनेक कुटुंबे बेघर

सोलापूर: रोहिणी नक्षत्राच्या पावसाने दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात धुमाकूळ घातला. वीज व वादळामुळे तीन महिलांचा मृत्यू झाला असून घरांवरील पत्रे उडाल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली. सोलापूर शहर व जिल्ह्यात वादळाने झाडे उन्मळून पडल्याचे सांगण्यात आले. शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या इंदूबाई बंडू सावंत (वय ४५) व सुभद्राबाई सुखदेव सावंत (वय ५२, रा. सांगोला-सावंत वस्ती) या दोघी पाऊस आल्याने झाडाखाली थांबल्या होत्या. झाडावर वीज पडल्याने या दोघी ठार झाल्या. मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे पावसाने घराची सिमेंटची चौकट अंगावर पडून कमलाबाई म्हाळाप्पा पडवळे या महिलेचा मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे सूर्यकांत बारबोले यांच्या शेतात वीज पडून दुभती म्हैस व वासराचा मृत्यू झाला. खंडाळी (ता. मोहोळ) येथे १०० हून अधिक घरांवरील पत्रे उडाले तर विजेचे खांबही उन्मळून पडले. उसाची शेतीही भुईसपाट झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील तुंगत, मगरवाडी, रोपळे बु।।, तारापूर, आष्टी, कौठाळी, येवती, बाभुळगाव व आढीव परिसरात अनेकांच्या घरावरील पत्रे, प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील पत्रे उडून गेले आहेत. हे पत्रे उडाल्याने तुंगत (ता. पंढरपूर) येथील एक जण जखमी झाला आहे. अक्कलकोट तालुक्यात चपळगाव, चिक्केहळ्ळी, हालहळ्ळी, कर्जाळ (अ) परिसराला फटका बसला. सोलापूर शहरालाही वादळाचा तडाखा बसला. वार्‍याच्या या तुफानी वेगामुळे डिजिटल फलक फाटून तुकडे तुकडे झाले़ अनेक घरांवरील पत्रे उडाले तर शहरातील विविध भागात सुमारे २०० झाडे उन्मळून पडली़ विजेच्या तारा आणि केबल तुटून रस्त्यावर पडल्याने वीजपुरवठा बंद झाला.

-------------

मोहोळ तालुक्यात ऊस पालथा झाला आहे. केळी व द्राक्षाचे सर्वाधिक नुकसान पापरी व खंडाळी गावाला झाले आहे. आपण तातडीने मुंबईला जात असून मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना भेटून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू. - लक्ष्मणराव ढोबळे, आमदार