महसूल कर्मचाऱ्यांची काळ्या फिती लावून निदर्शने

By Admin | Updated: July 2, 2014 01:03 IST2014-07-02T01:03:42+5:302014-07-02T01:03:42+5:30

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने मंगळवारी दुपारी दीड ते दोन यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली़

Demonstrating revenue workers with black strips | महसूल कर्मचाऱ्यांची काळ्या फिती लावून निदर्शने

महसूल कर्मचाऱ्यांची काळ्या फिती लावून निदर्शने


सोलापूर: आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने मंगळवारी दुपारी दीड ते दोन यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटवर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली़
२० आॅगस्ट २०१३ रोजी महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये सविस्तर चर्चा झाली होती़ त्यानुसार विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत़; मात्र याबाबत शासन निर्णय झाला नाही म्हणून संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. नायब तहसीलदारपदाचा राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला असून ग्रेड पे मात्र वर्ग ३ च्या पदाचा देण्यात आला आहे़ यामुळे नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवून ४६०० द्यावा, महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम बदलून त्याला महसूल सहायक असे पदनाम द्यावे, महसूल विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलास खात्यात नोकरी द्यावीआदी संघटनेच्या मागण्या आहेत़
या आंदोलनात शंतनू गायकवाड, प्रवीण शिरसीकर, लक्ष्मीकांत आयगोळे, धैर्यशील जाधव, मल्लिकार्जुन लकडे, सोमनाथ ताटे, सी़ एम़ कवडे, अनिल पवार, रऊफ नदाफ, प्रशांत गाडे, विनायक कुलकर्णी, डी़ टी़ जोशी, सचिन शेंडगे, तुकाराम गायकवाड, खंडू भोसले, रत्नाकर कांबळे, संजय कटके, राजू शेळके, अमोल शिंदे आदी उपस्थित होते़

Web Title: Demonstrating revenue workers with black strips