शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ‘कम्युनिटी स्प्रेड’चा धोका; काळजी घेण्याची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:21 IST

सोलापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय; नगरसेविकेचा पती, सेवानिवृत्त शिक्षक, रेशन दुकानदाराला कोरोना

ठळक मुद्दे शहराच्या विविध भागातून कोरोनाचे रुग्ण येत आहेतशहरात कम्युनिटी स्प्रेड (सामुदायिक संसर्ग) सुरू झाल्याची शक्यता शहरात यापूर्वी खासगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी, रेशन दुकानदार, किराणा दुकानदाराला कोरोनाची लागण

सोलापूर : शहरात रविवारी कोरोनाचे नवे १८ तर सोमवारी सकाळच्या सत्रात ७ नवे रुग्ण आढळून आले. शहराच्या विविध भागातून कोरोनाचे रुग्ण येत आहेत. त्यामुळे शहरात कम्युनिटी स्प्रेड (सामुदायिक संसर्ग) सुरू झाल्याची शक्यता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल) औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख व कोरोना वॉर्ड प्रमुख डॉ. प्रसाद यांनी वर्तवली आहे.

वारद फार्म येथील नगरसेविकेच्या पतीला ताप, खोकल्याचा त्रास होत असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास कमी न झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सिव्हिलमध्ये त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने रविवारी वारद फार्म परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. नगरसेविकेसह कुटुंबातील सदस्य सिंहगड येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाले. नगरसेविका आणि तिचे पती गेली महिनाभर या परिसरात धान्य वाटप व इतर मदत वाटप करीत होते. नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी  यांनी नगरसेविकेच्या घराजवळ राहणाºया लोकांना स्वॅब टेस्टसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवून दिले. 

घोंगडे वस्ती भवानी पेठ येथील मंडप व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मजरेवाडी परिसरातील एका रेशन दुकानात काम करणाºया कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. दमाणी नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून मोदीखाना परिसरात या महिलेचे रेशन दुकान आहे. गंगा नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली. ही महिला पिठाची गिरणी चालवते. 

पाच्छा पेठेतील सेवानिवृत्त एका शिक्षकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्यामुळे या शिक्षकाला शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या शिक्षकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. शनिवार पेठ, शास्त्री नगर, मुळेगाव रोड, सबजेल येथे कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. रविवार पेठेत दोन, न्यू पाच्छा पेठेत दोन, नीलमनगर परिसरात दोन रुग्ण आढळून आले आहेत. 

यामुळे घ्यावी लागेल काळजी - शहरात यापूर्वी खासगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी, रेशन दुकानदार, किराणा दुकानदाराला कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांच्या संपर्कातील अनेकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा मोदी खाना, मजरेवाडी, गंगा नगर येथील दुकानदार, पीठ गिरणी चालक यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरात कम्युनिटी स्प्रेडचा धोका आणखी वाढल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. 

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची टेस्ट पॉझिटिव्ह- सबजेलमधील आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी या आरोपीला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. त्याचा  अहवाल रविवारी आला. या आरोपीला चार महिन्यांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस